Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

१० शिक्षकांचा ग्लोबल गोल्ड टैलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे सत्कार

                 ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

 राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ गणित आणि विज्ञान विषयातील १० शिक्षकांचा ग्लोबल गोल्ड टैलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई याच्या तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील, त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ९ मार्च २०२५ रोजी करडी समाज हॉल, कामोठे येथे पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

सत्कारमूर्ती श्री विजय वाघेला (सेंट लॉरेन्स स्कूल अंधेरी), सौ .स्नेहा निनाद कर्णिक ( सेंट जोसेफ स्कूल मालाड मुंबई), सौ पूनम अनिकेत दीक्षित ( न. जी वर्तक स्कूल विरार), सौ.ज्योती सनाये(लेडी इंजीनियर हायस्कूल ताडदेव), श्री सतीश मिश्रा (द आंध्र एजुकेशन सोसाइटी हायस्कूल ), सौ नसीम कुरणे (रा. एफ नाइक विद्यालय), यांना मुंबई डिव्हिजनल बोर्ड येथील उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या गणित आणि विज्ञान विषयातील प्राविण्यामुळे ट्रॉफी, मेडल आणि सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.

सोनाली भालेकर( श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल) सौ.काजल सुर्वे( सेंट चार्ल्स हाई स्कूल, सांताक्रुझ पूर्व)साक्षी भोईटे, सौ. सुजाता सूर्यवंशी, ह्या नवोदित शिक्षकांचा पण सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याचे प्रमुख आयोजक  आणि संचालिका श्री व सौ मेघा श्रीराम महाजन, मुख्य अतिथी अभिनेत्री नयना आपटे,सहायक पोलिस निरीक्षक रत्ना खंडेवाल, अँटी  पायरसी सेल प्रमुख रामजीत गुप्ता उपस्थित होते. सत्कारमूर्तीचे पालक, विद्यार्थी समाज आणि सर्व स्तरातील लोकांकडून कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments