ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री मावळी मंडळ हायस्कूल, ठाणे येथे करण्यात आले होते.
'कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र' या ध्येयाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती (ऑन द स्पॉट जॉब इंटरव्ह्यू) घेतल्या गेल्या. ज्यामध्ये ठाण्यातील अनेक युवकांनी सहभाग नोंदवला. शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार संजय केळकर व आसरा फाऊंडेशनचे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कौशल्य रोजगार विभाग ठाणे सहआयुक्त संध्या साळुंखे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत, आसरा फाऊंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील, मित्र मेळा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शंकर संकपाळ, स्नेहा पाटील, डॉ. राजेश मढवी, महेश कदम, सिताराम राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments