ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड, शिवरल चौक येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मलनिसारण आरक्षण क्र ३३० येथे होत असलेल्या कचरा एकत्रीकरण, प्रेसिंग कचरा वाहतूक व कचरा गाडयांचे वाहन स्थळ प्रकल्पास स्थानिक रहिवाश्यांचा विरोध असून या प्रकल्पा विरोधात रहिवासी आक्रमक झाले आहेत. हा प्रकल्प मानवी वस्ती पासून दूर स्थलांतर कराण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 100 फुट रोड, नागरिक संघर्ष समितीने रस्त्यावर उतरून या प्रकल्पा विरोधात निदर्शने केली असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष विमल कटके यांनी दिली.
कल्याण (पुर्व) येथील १०० फुट रोड हा कल्याण पूर्व ला एकमेव वैभव प्राप्त झालेला रस्ता आहे ज्या रस्त्यावर रोज हजोरो नागरीक सकाळी व संध्याकाळी मोकळी व स्वच्छ हवा घेण्यासाठी तसेच फिरण्यासाठी येतात. १०० फुट रोडचे वैभव पाहुन हजारो नागरीकांनी स्वकष्टाने व कर्ज घेऊन स्वप्नातील घर विकत घेतले आहे. पुढील कित्येक वर्षे ते कर्जाचे हप्ते फेडत राहणार आहेत. या १०० फुट रस्त्याला लागुन महानगर पालिकीचे मलनिसरणाचे आरक्षण क्र ३३० असुन या आरक्षणात महानगर पालिका कचरा एकत्रीकरण, प्रेसिंग कचरा वाहतूक व कचरा गाडयांचे वाहन स्थळ प्रकल्प आणण्याच्या नियोजनात आहेत त्या बाबत स्थानिक १०० फुट रत्यावरील गुह प्रकल्पातील नागरीकांना, शाळा, महाविद्यालय यांना कुठल्याही प्रकारे विचारात न घेता हा प्रकल्प राबविण्याचे काम चालू केले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments