ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बनावट फोन पे अॅपवर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 26 फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका येथील आर. के. बझार या सुपर मार्केटमध्ये दोन इसम येवुन त्यांनी फिर्यादी यांच्या सुपर मार्केट मधुन किराणा सामान मधील ६२९३/- रू. किमंतीच्या वस्तु विकत घेतल्या. फिर्यादी यांच्या भावाला ऑनलाईन बिल भरतो असे सांगुन त्यांनी हे बिल अदा केल्याबाबत बनावट फोन पे अॅपवर दाखवुन बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणुक केली. याबाबत विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
या दाखल गुन्हयाचा कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने गुन्हयाचा तांत्रिक तपास करून या गुन्हयातील फसवणुक करून गेलेले आरोपी पंकज पाटील, वय २२ वर्षे, व अनिल कांबळे, वय २४ वर्षे, दोघेही राहणार ठाणे या दोन आरोपीना अटक केली. त्यांच्याकडे सखोल तपास करून कोळसेवाडी पोलीसस्टेशन व मानपाडा पो.स्टे. येथे दाखल गुन्हयातील मुदद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींच्या ताब्यातुन एकुण १६ हजार ४५५ रू. किमंतीचा किराणा माल वस्तु व एकुण चार मोबाईल फोन असा मुदद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनिरी. गणेश न्हायदे, पो.निरी प्रशासन नाईक यांच्या सूचनेप्रमाणे सहा. पो निरी दर्शन पाटील, पोलीस उप निरीक्षक सिराज शेख, पोहवा बोरसे, सांगळे, कापडी, जरग, सांगळे, पोशि सोनावळे, गिते यांच्या पथकाने केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments