Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आरटीई' प्रतिक्षा यादी टप्पा क्र.०१ प्रवेशासाठी मुदतवाढ ०१ एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू

०१ एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू

                   ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर

'आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते कि सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.२४ मार्च, २०२५ या तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस दि. ०१ एप्रिल, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

        प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील  निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्या बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे. तसेच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

000

Post a Comment

0 Comments