ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
२३ मार्च हा दिवस "शहीद दिन" म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. या दिनाचे महत्त्व जाणून आज जिल्हा परिषद शाळा काटई,केंद्र खोणी कल्याण, ठाणे येथे शहीद दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शाळेतील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अपेक्षित संस्कार सहज होत असतात. भारतातील महान क्रांतिकारकांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यांचे स्मरण खरं तर कायमच ठेवले पाहिजे. त्यांचे बलिदान विद्यार्थ्यांना माहीत व्हावे त्यांच्या कार्याचा , विचारांचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर संस्कार होऊन एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी हा उपक्रम शाळेत पार पडला. 
सौ.संगीता बाजीराव ठुबे यांनी शहीद दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमाचे पूर्व नियोजन केले.तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कोणतीच गोष्ट असाध्य नाही विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान माहित व्हावे व सहज हाताळता यावे या उद्देशाने त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील क्रांतिकारकांची माहिती शोधून प्रोजेक्ट पेपरवर लिहून आणण्यास सांगितले. विशेष म्हणजे इ. दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविल्याने या विद्यार्थ्यांनी देखील स्वतः माहिती शोधून उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची फलक लेखन संपूर्ण जबाबदारी संजू सुभाष रॉय या इ. तिसरीच्या विद्यार्थ्यांने पार पाडली. याशिवाय भगतसिंग, राजगुरू , सुखदेव तसेच महात्मा गांधी या क्रांतिकारकांची चित्रे ड्रॉइंग पेपरवर रेखाटल्याने अपेक्षित वातावरण निर्मिती साधता आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पेपरवर भारतातील क्रांतिकारकांची चित्रे चिकटवून माहिती शोधून लिहून आणली होती त्यांचे छोटेखानी प्रदर्शन मांडले होते.शाळेच्या शिक्षिका सौ. माधुरी पाटील यांच्या हस्तेहुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकसौ.संगीता ठुबे मॅडम यांनी सादर केले.
आपल्या देशाप्रती निष्ठा, प्रेम निर्माण करण्यासाठी तसेच क्रांतिकारकांचे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे राहण्याचे मनोबल, स्वहित सोडून जनहितासाठी धडपड करण्याची जिद्द अशा अनेक गुणांचा संस्कार या उपक्रमातून साध्य झाला.
.jpg)

Post a Comment
0 Comments