एमआयडीसी कार्यालयावर दिली धडक राजकीय आधार न घेता आंदोलन करण्याचा इशारा
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
वेळेवर पाणी बिल भरूनही गेली 12 दिवस पाणी टँचाईने हैराण झालेल्या 50 इमारतीतील काही नागरिकांनी सोमवार 23 तारखेला डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली. मात्र पुन्हा आश्वासन मिळाल्याने लवकरात लवकरात लवकरात आमची पाणी समस्या सोडविली नाही तर आम्ही राजकीय आधार न घेता कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला.
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेरिटेज देसले पाडा येथे 50, इमारती आहेत. या इमारतीना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या12 दिवसांपासून या इमारतींचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर कधी पाणीच येत नसल्याने येथील राहिवाशी पुरते हैराण झाले आहेत.अखेर संतापलेले रहिवाशांनी सोमवारी डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयात उपअभियंता आनंद गोगटे यांची भेट घेतली. मात्र कार्यकारी अभियंता आव्हाड यांच्याशी चर्चा करून माहिती देतो असे आश्वासन राहिवाशांना देण्यात आले.
याबाबत राहिवाशी म्हणाले, एमआयडीसी पाणी देईना आणि पाणी टँकर परवडेना अशी आमची अवस्था झाली आहे. एका टँकर करता दोन हजार मोजावे लागत असल्याने पाणी बिल का भरायचे असा प्रश्न राहिवाशांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
.jpg)

Post a Comment
0 Comments