ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
केंद्र सरकार पुरस्कृत व नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभाग योजना जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग योजना कार्यालय यांच्या आदेशानुसार व शैक्षणिक वर्षातील सर्वेक्षणातून ज्या असाक्षरांची नोंदणी भिवंडी क्षेत्रातील शाळांनी केलेले आहे, अशा एकूण ३४७५ असाक्षरांची परीक्षा ३३० केंद्रावर आज रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेच्या संदर्भात सर्व महत्त्वाच्या सूचना राज्यस्तरावरून, त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावरून सर्व केंद्र संचालकांना दिलेल्या होत्या. त्या सूचनेनुसारच ही परीक्षा घेण्यात आली.
अत्यंत उत्साही अशा वातावरणामध्ये ही परीक्षा पार पाडली. असाक्षरांनी साक्षर व्हावे आणि त्यांना लेखन, वाचन, स्वतःची सही आणि डिजिटल साक्षरता यावी अशा उद्देशाने असाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथेही असाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. केंद्र संचालक म्हणून अजय पाटील, पर्यवेक्षक अंकुश ठाकरे यांनी काम पाहिले. निरीक्षक म्हणून अर्चना वारघडे यांनी राहनाळ केंद्राला भेट दिली. भिवंडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले, गट समन्वयक वैशाली डोंगरे, तालुका समन्वयक नीलम पिसाळ, शैलेंद्र पाटील यांनी या परीक्षेचे उत्तम नियोजन केले होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments