१२ गोडाऊन सील
नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड ॲक्शन मोडवर
ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे
मालमत्ता कर हे पालिकेचे मुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. या सोबतच शासकीय अनुदानावर या शहरातील विकास कामे होत असतात. यासाठी नागरिकांनी आपले थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पुढे आले पाहिजे. अन्यथा प्रशासनास कारवाई करण्याची वेळ येऊ शकते. हे नुकताच अंबरनाथ नगर परिषदेचे सूत्र हातात घेतलेल्या नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी शहरातील बारा गोडाऊन ना सील करण्याची कारवाई करून, आपल्या ॲक्शन मधून दाखवून दिले.
त्यामुळे, आता अंबरनाथ मधील थकबाकीदार व कर बुडव्यांची गय नाही.
परिणामी शहरातील मोठ्या थकबाकीदारांवर आता कारवाईची गाज येणार असल्याने खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी गायकवाड यांनी कठोरपणे कारवाई कर वसुलीचे आदेश दिल्यानंतर कर विभाग प्रमुख नरेंद्र संख्ये यांच्या नेतृत्वाखाली कर निरिक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे थकबाकी दार मिळकतधारकांवर जप्तीच्या नोटिसा बजावून वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणे सुरू केले आहे. ज्या बालमत्ता धारकांचे एक लाखापेक्षा अधिक थकबाकी आहे अशांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अंबरनाथ पूर्व येथील गेमनानी कंपाऊंड येथील १२ गोडाऊन यांना सिल करण्यात आले असुन, ३ मालमत्ता धारकांकडून तात्काळ धनादेश जमा करण्यात आले..
प्रतिक्रिया :
" मागील वर्षापेक्षा अधिक मालमत्ता कर संकलित करण्याचा निर्धार मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. यातून शहराच्या विविध विकास कामांना वेग दिला जाईल. अनेकदा संधी देऊनही काही थकबाकीदार कर भरणा करत नसल्याने अशा कारवाईची नामूशकी प्रशासनावर ओढावली आहे. त्यामुळे 31 मार्च अखेरपर्यंत सर्व मिळकतदारांनी आपला कर भरणा करावा यासाठी प्रशासन शनिवार-रविवारी देखील अंबरनाथ करांच्या सेवेस तत्पर आहे ",
- नरेंद्र संखे ( कर विभाग प्रमुख अं. न. प.)
.jpg)

Post a Comment
0 Comments