मारहाणीचा व्हिडियो व्हायरल
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मोहन उगले असे या माजी नगरसेवकाचे नाव असून मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे. रविवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कामाचे श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता.
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. मोहन उगले यांच्यावर आरोप आहे की, त्यांचा महिलेसोबत वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेला लज्जास्पदपणे हात लावला. यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यां राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेबाबत प्रसिद्धी माध्यमांना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रतिक्रिया दिली की, काल रस्त्याचे भूमिपूजन होते. महापालिकेच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रयामध्ये पुरूषांच्या अंगावर जाणे, पुरूषांना धक्का बुक्की करणे हा प्रकार झाल्याने आम्ही बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या महिलेचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही. ती आमच्या पक्षाची पदाधिकारी नाही. कुठपर्यंत पुरुष सहन करु शकतो, त्याला पण लिमिट असते कायद्याने महिलांना संरक्षण आहे. महिलेने पुरूषावर हात टाकला ही गंभीर बाब असून पक्षाकडे आमदार, जिल्हा प्रमुख यांच्या कडे, मागणी असेल ज्यांचा पक्षाशी संबंध दाखवितात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मोहन उगले यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments