Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पत्रकाराला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर गुन्हे दाखल

 

शिळ डायघर पोलीस ठाण्यावर परिसरातील पत्रकारांची धडक

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण ग्रामीण भागातील पत्रकाराला समाजकंटकांनी ( ता. २८) शुक्रवारी भर चौकात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आला आहे. मात्र शिळ डायघर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत असताना पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हे दाखल न केल्याने माध्यमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर कायदेतज्ञच्या सल्ल्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 


शिळफाटा चौकातील पत्रकाराला मारहाणीचा सीसीटीव्ही समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिळ गावातील राहुल काटे आणि जितू आलिमकर यांनी फावड्याच्या दांडकाच्या सहाय्याने पत्रकार विनोद वास्कर यांना मारहाण केली आहे. शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र शिळ डायघर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

Post a Comment

0 Comments