गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कामगीरी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मेल एक्सप्रेस गाडयांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या उशाखालील पर्स उचलून चोरी करणा-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक करून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, घडयाळ, आय पॅड अशी एकूण 4 लाख 56 हजार 430 रूपये किमतीची मालमत्ता हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे.
22 मार्च रोजी 12:10 वा फिर्यादी महिला मंगलोर रेल्वे स्टेशन येथून निझामुददीन एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. हि एक्सप्रेस 23 मार्च रोजी कोपर रेल्वे स्टेशन पास होत असतांना त्यांची उशाखालील पर्स चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन डोबिवली रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
अशाप्रकारे रात्रीच्यावेळी येणा-या जाणा-या मेल एक्सप्रेस गाडयामध्ये बॅग उचलून चोरीच्या ब-याच गुन्हयाची कार्यप्रणाली एक सारखीच असल्याचे निदर्शनास आल्याने कल्याण युनिट ३, गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलिसांनी रात्रीच्यावेळी मेल एक्सप्रेस गाड्यांवर साध्या वेशात सापळे लावून गस्त करून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू होते.
गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी सहिमत अंजूर शेख, वय 29 वर्षे रा. रबाळे नवी मुंबई, याची माहिती घेवून त्यांस बदलापुर शहर हद्दीतून ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याच निष्पन्न झाले. त्याला या गुन्हयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडीत असताना त्याने एकूण 6 गुन्हे केल्याची कबूली दिली असून, गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आय पॅड, घडयाळे इ. काढून दिले असून 6 गुन्हे उघडकिस आणले आहे.
हि कामगिरी लोहमार्ग पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, व पो.निरीक्षक रोहीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट येथील पो.उपनिरीक्षक, प्रकाश चौगुले, सपोउपनिरी संदिप गायकवाड, पोलीस अंमलदार रविंद्र ठाकुर, लक्ष्म्ण वळकुंडे, अजय रॉधळ, राम जाधव, प्रमोद दिघे, हितेश नाईक, योगेश अदाटे, स्मीता वसावे, पदमा केंजळे, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनिल मागाडे, तांत्रिक शाखेचे सपोनिरीक्षक मंगेश खाडे, अंमलदार विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, अमोल अहिनवे यांनी केली असुन, या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा रविंद्र ठाकूर करीत आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments