Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जागतिक महिला दिना निमित्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

 

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पोलिसांचे कामाचे अनियमित तास, कामाचा ताण तणाव तसेच कौटुंबिक जबाबदारी यातून स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांना लक्ष द्यायला देखील वेळ मिळत नाही. प्रकृतीकडे दुर्लक्ष होते , त्यामुळे अचानक हार्ट अटॅक सारख्या घटना घडतात. त्यातल्या त्यात  महिलांच्या बाबतीत तर ही बाब अत्यंत अवघड आहे. महिलांना आपल्या घर, संसार, मुलं बाळ बघून तारे वरची कसरत करीत आपली नोकरी करावी लागते.  त्यामुळे त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडेही  लक्ष  देता येत नाही . लहान सहान आजार सहन करण्याचे वरदान निसर्गाने   स्त्रियांना जन्मतःच दिले असल्याने बहुतांश स्त्रिया  छोटे मोठे आजार अंगावर काढतात आणि पुढे भविष्यात अशा छोट्या आजारांच स्वरूप मोठ्या प्रमाणात दिसू लागतं आणि  तेव्हा फार उशीर झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांनी मा. श्री अतुल झेंडे साहेब ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 03 कल्याण, आणि मा. श्री कल्याणजी घेटे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्व संध्येला  महिलां पोलीस अधिकारी व महीला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी ओयेसिस हॉस्पिटल कल्याण येथे डॉ राजेश पाखरे, डॉ दयानंद देखणे,डॉ गणेश शिरसाठ , डॉ सुचित्रा तेलवणे तसेच डॉ श्रीमती भाग्यश्री पाखरे आणि सहकारी  यांच्या सहकार्याने  मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

सदर वेळी हृदयरोग, त्वचा, ऑर्थो तसेच महिलांचे आजार याविषयी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. सदर वेळी खडकपाडा पोलीस स्टेशन नेमणुकीतील महिला पोलीस अधिकारी व  महिला पोलिस अंमलदार यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून स्वतः करिता वेळ काढून  वैद्यकीय तपासणी  शिबिराचा लाभ घेऊन तपासणी करून घेतली आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments