Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ती आणि तिचे आरोग्य

  

नमस्कार मैत्रिणींनो जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

   अपर्णा निमकर / मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक

                        ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

आज सर्व जगभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने सर्वत्र छान छान उपक्रम राबवले जात आहेत. महिलांचा सन्मान, त्यांचा सत्कार त्यांच्या गुणांची दखल घेण, त्यांचे कौतुक करणं इत्यादी....

हे सर्व काय फक्त आठ मार्च याच दिवशी करायचं असतं का? 

स्त्री शक्ती ही आगाध. आहे स्त्रीचं कर्तुत्व मोठं आहे. स्त्रीने ठरवली प्रत्येक गोष्ट ती प्राण पणाला लावून पूर्ण करते. अशा कर्तृत्ववान स्त्रिया आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात.

आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी अपर्णा निमकर आपल्यासमोर स्त्रियांचा कौतुक तर करणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त स्त्रियांनी आपल्या आरोग्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे मग ते शारीरिक असो वा मानसिक ते सांगणार आहे.

तुमच्यासाठी एक लेखांची श्रृंखला घेऊन येत आहे. या लेखांमधे महिलांच्या मानसिक समस्या व त्यावरील उपाय आपण जाणून घेणार आहोत.

 आजच्या जर जगामध्ये आपण पाहिलं तर महिला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जात आहेत जसे भीती ताण तणाव, नैराश्य, कुचंबना,घुटमळ, अपयश, तारेवरची कसरत, तरीही कोणीही कौतुक करत नाही, ज्याला आपण इंग्लिश मध्ये ऍप्रिसिएशन म्हणतो. सगळ्या गोष्टींना सांभाळून घेत जुळवा जुळव करत तडजोड करताना ती दिसते. तिच्या मनावर त्याचप्रमाणे शरीरावर खूप प्रकारे नकारात्मक परिणाम होत असतात. मनाचे म्हणाल तर हळूहळू ही स्त्री जी अतिशय उत्साही आनंदी आणि बोलकी असते ती आपल्याला निराश, थकलेली आणि गप्प गप्प दिसायला लागते. तिच्यातला आत्मविश्वास ढळताना दिसतो कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामांमध्ये तिला पुढाकार घ्यावा वाटत नाही सगळ्या गोष्टींमधला सगळ्या नात्यांमधला ओलावा कमी होत चाललेला दिसतोय.  ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते ती स्वतःची काळजी न घेता स्वतःची परवा न करता आपले प्राण पणाला लावत असते याचा परिणाम असा होतो की महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं सगळ्यात पहिला त्रास महिलांमध्ये आजकाल जास्त दिसतोय तो म्हणजे थायरॉईड चा प्रॉब्लेम, ज्या मुळे महिलांना त्यांच्या वजना वरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहत नाहीये एक तर जास्त वाढते वजन किंवा खूपच कमी होते, वजन ह्या दोन समस्या थायरॉईडमुळे जाणवतात याचा साईड इफेक्ट असा आहे - खूप थकवा येणं, केस गळणे, डोळ्यांची जळजळ होणं, अपचन,निराशा, दुःखी राहणं मनामध्ये नकारात्मक विचार येणे बऱ्याचशा स्त्रियांमध्ये तर सतत रडण्याचे ही प्रमाण वाढलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट थायरॉईड जर आपण म्हटलं तर हा आपल्या महिलांच्या मनावर असलेल्या ताण तणावाचा परिणाम आहे. दहा पैकी जवळजवळ आठ ते नऊ महिलांमध्ये हा त्रास दिसण्यात येतोय आणि डॉक्टर कडे गेलो की आपल्याला सरळ गोळ्या चालू होतात. मैत्रिणींनो तुमच्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण असेल तणाव असेल त्रास असेल कुठल्याही प्रकारचं बंधन असेल तर कृपा करून त्याबद्दल काहीतरी विचार करा त्याच्यावरती काहीतरी उपाय काढा त्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे घरचे सखे सोबती घरचेच व्यक्ती मदत करू शकतात किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर मदत करू शकतात किंवा तुम्ही समुपदेशक म्हणजेच कौन्सिलर्स ला जाऊन भेटू शकतात आणि त्याच्यातून मुक्तता मिळाली की शारीरिक सगळ्यात समस्या हे दूर होतात.

अपर्णा निमकर 

मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक

९१५२३०११३७

Post a Comment

0 Comments