ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शहरात प्रवाशाच्या मागणीनुसार अनेक खाजगी कंपन्या प्रवासी वाहतूक सेवा देतात. मात्र या चालकाकडे प्रवासी वाहतुकीसाठी लागणारे टी (प्रवासी वाहतूक) परवाना नसल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेनेने उघड केले आहे. वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांनी कल्याणच्या दुर्गाडी चौकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाच्या परवान्याची तपासणी केली असता, या वाहनचालकांकडे एलएमव्ही लायसन्स असल्याचे आढळून आल्याने प्रवाशाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहतूक सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी केली आहे.
खाजगी कंपन्याकडून मिळणारी प्रवासी वाहतूक सेवा स्थानिक रिक्षा चालकाकडून मिळणाऱ्या सेवे पेक्षा तुलनेने स्वस्त आणि किफायतशीर असल्याने प्रवाशाकडून या कंपन्याची सेवा स्वीकारली जाते. मात्र या कंपन्या गरजेनुसार प्रवाशांना सेवा पुरवताना आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या टॅक्सीसह चारचाकी वाहनचालकांना जबाबदारी देतात. मात्र या चालकाकडे हलकी वाहने चालविण्याचा परवाना असतानाही स्वताची खाजगी वाहने हे चालक प्रवासी वाहतुकीसाठी वापरत असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेनेने चालकाचा परवाना तपासल्यानंतर समोर आले आहे.अशा जवळपास ७ ते ८ वाहन चालकांना पकडून भोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसाकडे सोपवले वाहतूक पोलिसांनी या चालकांना ऑन लाईन दंड ठोठावत लायसन्स बाबत कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ ची असल्याचे सांगत त्यांनी हात झटकले. दरम्यान प्रवासी वाहतूक करण्याचा अधिकृत परवाना नसताना आपली खाजगी वाहने चालविण्याच्या परवान्यावर हे चालक वाहने चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याने याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे असताना आरटीओकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त करत भोर यांनी याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments