Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी सुविधा देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी शिष्टमंडळाने घेतली स्टेशन मास्तरांची भेट

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी करण्याच्या सुविधांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कोपर रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.

कोपर रेल्वे स्थानक हे डोंबिवली शहरातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथून वसई दिवा पनवेल या मार्गाकरीता देखील ट्रेन जातात. तसेच मुंबईला आणि कसारा-कर्जतच्या दिशेने पण ट्रेन सुटतात. हजारो प्रवासी रोज येथून प्रवास करतात. पण या ठिकाणी कोपर पूर्वेच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना प्रवास करण्याकरिता लिफ्टची सोय उपलब्ध नाही. तसेच कोपर पूर्वेला तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी उपलब्ध नाही. तिकीट खिडकी उपलब्ध नसल्यामुळे सर्व प्रवाशांना कोपर पश्चिमेला जाऊन तिकीट काढून पुन्हा परत यावे लागते.

 कोपर रेल्वे स्थानक बांधून बरीच वर्षे झालेली आहेत. पण या रेल्वे स्थानकावर मुतरीची सुद्धा सोय नाही. पनवेल किंवा वसई वरून आलेले प्रवासी मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अडचण होते.  खास करून महिला, ज्येष्ठ नागरिक , लहान मुले यांनी काय करायचे ? यापूर्वी पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वारंवार निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सहीचे निवेदन देण्यात आले. मात्र समस्या जैसे थे राहिल्याने  पुन्हा निवेदन देण्यात आले.

लवकरात लवकर कोपर पूर्वेला तिकीट खिडकी, कोपर स्टेशन वर मुतारी आणि कोपर पूर्वेला लिफ्ट सोय करावी. या मागण्यांचे लेखी आश्वासन मिळावे अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे गुरुवार १७ एप्रिल रोजी कोपर स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, डोंबिवली शहरप्रमुख अभिजित सावंत, उपशहर प्रमुख सुधाकर वायकोळे, युवासेना उपजिल्हा अधिकारी परेश काळण, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहर युवासेना सुदर्शन जोशी, विभाग अधिकारी प्रणव सावंत, विभाग प्रमुख विनायक गोवलकर, उपविभाग प्रमुख कुणाल पवार, किशोर सोहनी, विलास नायर, शाखाप्रमुख राकेश राणे, अभय दिघे, मंगेश सरमळकर, शिवसैनिक नारायण गायकवाड आणि इतर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments