Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीतील नव वर्ष स्वागत यात्रेचे सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

या वर्षी डोंबिवलीतील हिंदू नवीन वर्ष स्वागत यात्रा सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत असून, त्याच उत्साहात, हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी जोरात सुरु आहे. या वर्षीच्या यात्रेत स्व या संकल्पनेवर आधारित, 'स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन' या समृद्ध व संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवरील चित्ररथ असणार आहेत. याव्यतिरिक्त, आठवडाभर धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, कार्यक्रमाची रचना ही समाजातील सर्व घटकातील सर्व वयोगटांना नजरेसमोर ठेवून, केलेली आहे.

वृंदावनचे प्रभूदेशदास धर्मप्रसारक महंत आचार्य प्रणयजी यावेळी नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या शहरात असतील आणि आपल्या नव वर्ष स्वागत यात्रेतेहीं ते सहभागी होतील. स्व वर आधारित नव वर्ष स्वागत यात्रेची तयारी आणि कार्यक्रमाची रचना, फक्त डोंबिवलीकरांसाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान साठी नवीन जाणीव निर्माण करणारी ठरेल, अशी आशा संयोजन समितीला आहे.

या स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गणेश मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सेक्रेटरी प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी, मंदार हळबे, राजय कानिटकर, आनंद धोत्रे, आणि संयोजन समितीचे प्रमुख संयोजक अमेय काटदरे तसेच संयोजन समितीचे सदस्य दीपक काळे, शामल जोशी, अमित सराफ, चिन्मय कुलकर्णी, आकाश गायकवाड आणि मार्गर्शक जयकृष्ण सप्तर्षी, उपस्थित होते.

यावर्षीच्या स्वागत यात्रेत विविध प्रकारचे सुमारे ३० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. आणि आजमितीस ८० विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरणीय क्षेत्रातील संस्थानी आपला सहभाग निश्चित केला आहे. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षणं म्हणून ढोल पथकांना ही चौकांमध्ये ढोल वादनास परवानगी देण्याचा विचार असून, संस्कार भारतीतर्फे गणेश मंदिरासमोर महारांगोळी काढण्यात येणार आहे. याच दरम्यान गणेश मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपाडव्याच्या अगोदर एक आठवडा ते रामनवमी पर्यंत आयोजित केलेले आहेत. 


Post a Comment

0 Comments