Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रस्ता बाधित वृद्ध महिलेला केडीएमसीने केले बेघर

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आपल्या अनेक उलट सुलट कामांमुळे  कल्याण डोंबिवली महानगर पालिका नेहमीच चर्चेत असते, आता देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार उघडकीस आला असून रस्त्या मध्ये बाधित होणाऱ्या वृद्ध विधवा महिलेला तीचे पुनर्वसन न करताच बेघर केले आहे. एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे बेघर केल्याने नगरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 



कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत 65 इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असताना एका विधवा महिलेच्या घरावर बुलडोझर चढवत महापलिकेने तिला बेघर केले आहे. कल्याण पश्चिमेतील सह्याद्री नगर येथे पुनर्वसना आधीच महिलेला बेघर केल्यामुळे महिलेचा संसार रस्त्यावर आलाय. रस्ता रुंदीकरणात दोन फूट घर जात असताना देखील पालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरावर बुलडोझर चालवत महिलेला बेघर केले आहे.  

बेघर महिलेच्या व्यथा ऐकण्यासाठी पालिका अधिकारी सक्षम नसल्याचा महिलेचा आरोप असून विकासकाच्या इमारतींना रस्ते पुरवण्यासाठी घरावर बुलडोजर चालवण्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. पुष्पा अनंता अंकुश असे बेघर केलेल्या महिलेचे नाव असून महिलेचा संसार उघड्यावर आल्यामुळे महिला हवालदिल झाली आहे. या महिलेला बीएसयुपी योजनेत घर देतो असे सांगण्यात आले मात्र बीएसयुपी प्रकल्पातील घरात गेले असता त्या घरांना दरवाजे, खिडक्या, वीज, पाणी नाहीत. तर काही घरांना टाळे असून हे टाळे तोडून राहण्याचा अजब सल्ला या अधिकाऱ्यानी दिल्याचे महिलेनी सांगितले. 

 या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. 


Post a Comment

0 Comments