ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
अमृताते ही पैजा जिंकणाऱ्या मायमराठीचा गौरव आणि मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'तात्यासाहेबांना' श्रद्धांजली अर्पण करत आपण 'मराठी दिन' जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
मंडळी!आपण बघतो बाहेर प्रदूषण वाढले आहे. वायु प्रदूषण, जलप्रदूषण,ध्वनी प्रदूषण 'तापाने फणफणली आहे धरती' या प्रदूषणाला आळा घालणे जसे गरजेचे आहे, तसेच *'मनाचे प्रदूषण'* पण वाढले आहे. विचारांच्या सात्विकतेने मनाचे प्रदूषण दूर व्हावे, सात्विक विचारच मनाला स्पर्शावे. देवा! सर्वांचं भलं कर या विचारांचे बीजेच मनामनात रुजावे हा शुद्ध हेतू.
पुस्तक वाचण्याने 'वाचन संस्कृती' मुळेच हा मनाच्या शुद्धतेचा विचार बहरतो. चांगल्या वाचनामुळे चांगले विचारच मनात येतात आणि म्हणूनच आपल्या शाळेत *पुस्तक वाचनाचे* फायदे या फलकाचे अनावरण शाळेच्या मुख्याध्यापिका प्राथमिक -माध्यमिक विभाग,ग्रीन्स इंग्लिश स्कूल,आदरणीय सौ. अर्चना अरविंद मोहिते मॅडम यांच्या हस्ते झाले.श्रद्धा भोसले, कांचन अरुणावतीकर या कला शिक्षकांची सर्जनशीलता फलकाच्या रूपाने साकार झाली.
संगीत शिक्षिका सौ. ज्योती चौहान यांच्या 'हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे' या प्रार्थनेने *मराठी गौरवदिनी* सकारात्मक लहरीने वातावरण निर्मिती झाली.
मराठी विषय शिक्षिका सौ. भारती शिवाजीराव पाटील यांच्या या संकल्पनेला मराठी विषय शिक्षिका अनिता बाविस्कर, सौ. सविता पाटील, सौ.संजोता जोशी, सौ. शशिकला वेडे , सौ. सुरेखा सावंत, सौ.सोनाली सोनवणे, सौ.अनिता तहकीक यांचे सुंदर सहकार्य लाभले.
दोन्ही उपमुख्याध्यापिका सौ. जयश्री गिरिश वाळिंबे मॅडम आणि सौ. दीप्ती पोरे मॅडम यांचा सुंदर प्रतिसाद लाभला.
.jpg)

Post a Comment
0 Comments