Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीकरांच्या मागणीनुसार शिवसेने कडून 'छावा' चित्रपटाचा मोफत शो

 

चित्रपट पाहून डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू

              ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर  

छत्रपती सांभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट देशभरातील थिएटर प्रदर्शित होत आहे. डोंबिवलीकरांना हा चित्रपट पाहता यावा याकरिता त्यांनी शिवसेनेकडे मागणी केली होती. डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या मागणीनुसार शनिवार 1 मार्च रोजी मधुबन चित्रपटगृहात डोंबिवलीकर प्रेक्षकांकरता 'छावा 'चित्रपट मोफत दाखविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजेश मोरे यांनी यांचे आयोजन केले होते. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा व छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा सामाज्यकरता आपले बलिदान कसे दिले हे चित्रपटातून पहावे असे आमदार मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.छत्रपट पाहता डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले.

Post a Comment

0 Comments