Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पश्चिमेत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह


                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण कुणाल म्हात्रे 

कल्याण संस्कृती मंच आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ मोठ्या दिमाखात संपन्न झाली. यंदाच्या स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच महिला विशेष संघटनेकडे यजमानपद देण्यात आले होते. इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉ अर्चना सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले. यजमानपद स्विकारल्यावर वर्षभर आपली संस्कृती जपणारे विविध कार्यक्रम व उपक्रम करत स्वागतयात्रेचे 'गौरव परंपरेचा, उत्सव संस्कृतीचा' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवले.


आयुक्त बंगल्यापासून सुरू झालेल्या शोभायात्रेत ढोल-ताशा, लेझीम सह सुमारे ६० चित्ररथ सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावर कल्याणकर बहुसंख्येने उत्साहाने नववर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. केडीएमसी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड, खासदार सुरेश म्हात्रे, माजी  आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर देखील यात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर आनंदाने आणि उत्साहाने ओसंडून वाहत होता. या वर्षी असंख्य संस्था स्वतःहून स्वागतयात्रेचे स्वागत करत होत्या.








नमस्कार मंडळ येथे यात्रेची सांगता होत असताना सर्व सहभागी संस्थांचे आयोजकां तर्फे सत्कार करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉ. अर्चना सोमाणी, सचिव अ‍ॅड. नीता कदम, प्रकल्प प्रमुख अ‍ॅड. अर्चना सबनीस, सहप्रमुख मीनाक्षी देवकर व सर्व महिला सदस्या यांनी कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सल्लागार ॲड. निशिकांत बुधकर व इतर सर्व पदाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पत्रकार, स्वागतयात्रा प्रायोजक, विविध प्रकारे मदत करणार्‍या अनेक सामाजिक संस्था, तसेच स्वागतयात्रेत प्रचंड उत्साहाने सहभागी होऊन ही स्वागतयात्रा नेत्रदीपक करणार्‍या सर्व नागरिकांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments