सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
सादर केलेल्या सादरीकरणाने
पटकावला प्रथम क्रमांक
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळी कल्याण पूर्वेत हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या विद्यमाने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेत विविध संस्था संघनांचे प्रतिनिधी यांचे सह नागरीकांनीही उत्सुर्तपणे सहभाग घेतला होता . या यात्रे सहभागी झालेल्या शाळांपैकी सम्राट आशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. द्वितीय क्रमांक गणेश विद्या मंदीर तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मातोश्री विद्यालयाला देण्यात आले .
हिंदू नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात चैत्र शुध्द १, शके १९४७ या हिंदू नव वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणाजवळील साई बाबांच्या मंदीरासमोर आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते गुढी उभारून या नव वर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ही स्वागत यात्रा गणपती चौक, मुख्य बाजार पेठ, जुनी जनता सहकारी बँक, म्हसोबा चौक, तिसगांव नाका या मार्गातून पुढे जाऊन या स्वागत यात्रेचा समारोप तिसाई मंदीराच्या प्रांगणात करण्यात आला.
या स्वागत यात्रेत भाजपा कल्याण जिल्हा उपाअध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व भाजपा अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक मनोज राय, शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे, विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, माजी नगरसेविका माधुरी काळे, उद्योगपती अमित सोनवणे, संजय गायकवाड, भगवान भोईर, दत्ता गायकवाड, शाम शेळके, रवी हराळे, केतन रोकडे, ए.सी.पी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश नहयादे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
तिसाई मंदीराच्या प्रांगणात संपन्न झालेल्या स्वागत यात्रा समारोपात स्वागत यात्रेसाठी योगदान देणारे मान्यवर तसेच यात्रेत सहभागी झालेल्या शाळा, संस्था, संघटनांचा आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णू जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदिप तांबे यांनी मानले.
.jpg)










Post a Comment
0 Comments