Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टिटवाळयात शासकीय अधिकारी कर्मचारी व कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण तालुका पोलीस स्टेशन व रेड  स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी शनिवारी कल्याण तालुका पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

                        या शिबिरात मोफत हृदयरोग,तपासणी, इसीजी, बीपी, शुगर, अस्थिरोग तपासणी, नेत्र तपासणी, नाडी परीक्षण, दंत तपासणी, फिजिओथेरपी, रक्त तपासणी तसेच अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा सुमारे 150 शासकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाने लाभ घेतला. या शिबिरास एम्स हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, अलकेम लाईफ कंपनी, इलाइट डेंटल क्लिनिक, क्लिनिटेक लॅबोरेटरी लिमिटेड, आय ऑप्टिक्स, रि लाईव्ह फिजीओथेरेपी व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. 




 शिबीर यशस्वी करण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम व त्यांच्या सर्व टीमचे तसेच रेड स्वस्तिक सोसायटी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रमोद नांदगावकर  व त्यांच्या  संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले. 


Post a Comment

0 Comments