Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महापालिकेच्या ६/फ प्रभागात रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणा-या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीची धडक कारवाई

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचा-यांना रस्त्यावरील रहदारीतून ये-जा करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार  ६/फ प्रभागाच्या सहा.आयुक्त  हेमा मुंबरकर यांनी डोंबिवली पूर्व येथील  90 फीट रोड  परिसरातील रस्त्यांवर/ पदपथांवर भरपूर दिवसांपासून उभी असलेली असलेली  ३ तीन चाकी वाहने  (रिक्षा), १ चारचाकी वाहन (छोटा टेम्पो)), अशी एकूण ४ बेवारस वाहने  जप्त करून करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. 

सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांचे मदतीने आणि  १ हायड्रा, १डंपर, यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments