Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वडिलांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित

 बापाचं दुःख दिसत नसतं,बाप झाल्यावर कळत असतं 

 तेव्हा मात्र बाप नसतो, आयुष्यभर बाप आठवतो.

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

वडिलांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित.जिजाई सेवा बहुउद्देशीय संस्था कल्याण आणि सिता ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नगरीत, कल्याण शहरात  *"बाप"* या मुल्यातून एक वेगळी संकल्पना संमेलनाच्या माध्यमातून  राबवीण्यात आली..."बाप" नावाची कवणभूपाळी  कल्याण शहराच्या परिसरात घुमू लागली होती.

बापासाठी व्यक्त होण्यासाठी राज्यस्तरीय मंच मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आला.रविवार दि.२३/३/२०२५ रोजी वैष्णवी लॉन्स् च्या भव्य पटांगणावर दिग्गज मान्यवरांची उपस्थिती शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,धार्मिक  कीर्तनकार, साहित्यिक, रसिक,आप्तस्वकीय, मित्रपरिजनांच्या उपस्थितीत हे संमेलन संपन्न झालं.

सदर कार्यक्रम आयोजक आदरणीय कवयित्री समाजसेविका सौ कल्पना संदीप पाटील , आयोजक आदरणीय डॉ. शंकर अंदानी साहेब आणि संयोजक आदरणीय कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील सर यांच्या अथक परिश्रमाने हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून


दिले होते. आणि हे आयोजन साहित्यिकांना व्यक्त होण्या साठी एक परवणीच होती. कार्यक्रमाच्या 

*राज्यस्तरीय कवी संमेलनाचे मुख्य अतिथी* 

१)मा. श्री विश्वनाथ भोईर,आमदार कल्याण पश्चिम 

२)मा. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर आमदार कोकण विभाग शिक्षक मतदार संघ 

३) मा. श्री रवी पाटील साहेब शहर प्रमुख कल्याण पश्चिम 

*राज्यस्तरीय कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे* 

१) ह.भ.प. श्री सत्यवान पुंडलिक पाटील (प्रसिद्ध कीर्तनकार)

२) ह.भ.प. श्री राजेंद्र नामदेव पाटील ( जे डि सि सि बँक देवगांव ) सेवानिवृत्त सचिव

३) मा. श्री प्रशांत भामरे सर अध्यक्ष कोकण विभाग महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटना.,

महाराष्ट्र शासन नियामक मंडळ सदस्य.,

*राज्यस्तरी कवी संमेलनाचे विशेष अतिथी*

१) मा. श्री जयवंतराव लुका पाटील ( उद्योगपती आणि प्रगतशील शेतकरी )

२) मा.श्री.कैलास यादव सरोदे. (सेवानिवृत्त -कलाशिक्षक)

*राज्यस्तरीय कवी संमेलनाचे  पाहुणे*

१) मा. श्री अरविंद आत्माराम पाटील

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मुंबई 

२) मा. श्री माधवराव तोताराम

 पाटील ( जे डि सि सि बँक देवगाव ) शिपाई.

३) मा. श्री श्रीहरी रामकृष्ण पाटील प्राथमिक शिक्षक ( तुका आप्पा )

*राज्यस्तरीय कवी संमेलनाचे प्रमुख उपस्थिती*

१) मा. श्री सुनील वामन चौधरी 

मा नगराध्यक्ष अनप 

निरीक्षक जळगाव लोकसभा, अंबरनाथ शहर संघटक.

२) मा. श्री सुनील रा. वायले 

शिवसेना उपशहरप्रमुख कल्याण (प.). मा नगरसेवक 

३) मा. श्री अनिल बोरनारे सर 

प्रदेश निमंत्रीत सदस्य भाजपा महाराष्ट्र

४) मा. डॉ जितेंद्र पाटील साहेब 

लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटल 

समाजसेवक प्राणी मित्र दानशूर व्यक्तिमत्व 

५) मा. श्री प्रकाश भोईर साहेब 

विभाग प्रमुख चिकन घर कल्याण 

६) मा.श्री दिलीप तडवी सर 

   मुख्याध्यापक , स्काऊट गाईड स्थानिक संस्था कल्याण, सचिव.

अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला... 

    सदर साहित्य संमेलन हे केवळ "बाप" या संव्वेदनशिल विषयावर असल्याने  "बाप" या भावनेला  जनमाऩसातून आलेला प्रतिसाद हा "न भूतो न भविष्यती"...असाच होता.दिपप्रज्वलन झाल्यावर सादरीकरण सुरूवात झाली. वेदनेच्याही पुढे आपण कोसो दूर निघून जेव्हां जातो तेव्हा कुठे तरी संव्वेदना ही जागृत होते..!! आणि  त्याच जागृततेची अनुभूती  दिसून आली. "बापलेपणातला" महापूर जणू सारस्वताच्या गर्भीत भावनेतुन प्रसवत होता.सहित्य संमेलनात चाळीस कवींनी सहभाग घेतला होता...बाप या भावनेंने भारावलेलं कवीमन 

आपल्या मुक्तकंठातून व्यक्त होत होतं.वेळेच भानही ऊरल नव्हत. जेवणाची वेळ उलटून देखील जेवणाची भूक लागली नाही सर्वेच कवी बाप या कविता मध्ये मग्न झाले शेवटच्या कवी पर्यंत सर्वच जण एकाग्रताने मग्न झाले होते आणि कधी संध्याकाळ झाली हे कळलच  नाही...सारस्वतांच सादरीकरण नंतर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार ह भ प आदरणीय सत्यवान महाराज त्यांच्या  भाषणाने संतांची वाणीतून सर्वांना बोध दिला आणि सर्व सारस्वतांचे खूप गोड कौतुक केले. त्या नंतर कार्यक्रमाची सांगता करताना कार्यक्रमाचे संयोजक श्री संदीप ईश्वर पाटील सर कल्याण देवगावकर यांनी सर्व दिग्गज व्यक्तींच्या शुभहस्ते  समग्र सारस्वतांना संन्मान चिन्ह, संन्मान पत्र आणि स्वतः बनविलेले पेंटिंग त्यावर बाप लिहून असे स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. सकाळी चहापाणी नाश्त्याची व्यवस्था आणि दुपारी सुग्रास भोजनाचे ही आयोजन केले होते. सर्वच उपस्थिती त्यांनी शिवशाही जेवणाची व्यवस्था केली असे संबोधिले आणि आयोजक संयोजक यांचे खूप खूप आभार मानले सर्व सारस्वतांनी , दिग्गज व्यक्तींनी ,प्रमुख पाहुणे, रसिक मित्रांनी आणि कवी मित्रांनी या सर्वांनी असे कळविले आजचा बाप या विषयावर व्यक्त होण्यासाठी हा कार्यक्रम जणू महाराष्ट्रातील पहिला असावा अशी भावना व्यक्त केली.

आणि विशेष म्हणजे ह्या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रसिद्ध कवी जणू शब्दांचा अलंकार आदरणीय नमाई  सुभाष नाईक. मीरा-भाईंदर. (सिंधुदुर्ग). यांनी संयोजक कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदिप ईश्वर पाटील सर यांना *बाप* ही *पदवी बहाल केली*. सर्वांच्या उपस्थितीत त्यामुळे कार्यक्रमातील सर्वच व्यक्तींनी कार्यक्रमाचे सार्थक झाले असे सर्वांनी गोड कौतुक करून अभिनंदन करत सर्वेच स्तरावरून संदीप ईश्वर पाटील सर यांना शुभेच्छांचे वर्षाव होत आहे तसेच त्यांचे जन्मभूमी खान्देशातील पारोळा तालुक्यातील देवगाव गावाचे सुपुत्र अशी आगळी वेगळी त्यांची ओळख सर्वच गावकऱ्यांनी व त्यांचे शिक्षक मित्र नातेवाईक यांनी आपापल्या परीने कार्यक्रमाचे गोड कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ऊपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद  घेऊन पुनर प्रस्थान केले.तसेच बापासाठी जनजागृती व्हावी बापाचे प्रेम पुन्हा जागृत व्हावे लोकांना कळावे येणाऱ्या पिढीला वेदनांचा धनी बाप कळावा त्यासाठी व जो बाप आयुष्यभर कधी व्यक्त झाला नाही लेकरांच्या पायी व संसाराच्या पायी जगाच्या शिव्या श्राप खात व खस्ता खाल्ल्या त्या बापासाठी व्यक्त होण्यासाठी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्याचा प्रयत्न संपन्न झाला. 

विशेष म्हणजे श्री संदीप पाटील सरांनी उपस्थित असलेल्या सर्वेच दिग्गज व्यक्तींचे व सारस्वतांचे कवी प्रेमी रशिक  मित्रांचे व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी आप आपल्या परीने योगदान व सहकार्य दिले त्या सर्वच  मायबापांचे सर्वांचे मनापासून त्यांनी खूप खूप आभार व धन्यवाद व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments