मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांचे गेल्या आठ दिवसापासून नदी पत्रात सुरू होते आंदोलन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पुढाकारने गेल्या आठ दिवसापासून नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरु होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारेने नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल, नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल असे आश्वासित केले आहे. यानंतर शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, यांच्या उपस्थितीत सुरु असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवणारी उल्हास नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात पडली असून गेल्या आठ वर्षापासून प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम हे सातत्याने पाण्यात उतरून उपोषण करत आहेत. अनेक वेळा सरकारकडून आश्वासन मिळत गेली परंतु निर्णय काही लागला नाही. यावेळी देखील नितीन निकम गेल्या आठ दिवसापासून उल्हास नदीमध्ये बसून आंदोलन करत होते.
याबाबत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, यांनी तातडीने बैठक घेऊन संबंधित विषयावर विषय निकाली काढला. येणाऱ्या पाच जून पर्यंत उल्हास नदी जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागाला सांगण्यात आले आहे. उल्हास नदीमध्ये वेगवेगळ्या कंपनी द्वारे केमिकल सोडले जाते त्यांच्यावर कायद्याने गुन्हे दाखल करण्यात येतील. उल्हास नदीसह महाराष्ट्रातील सर्व नद्यांना स्वच्छ करण्यासाठी लागणारा निधी हा दिला जाईल, आणि सर्व नद्या स्वच्छ करण्यात येथील असे आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिले.
आज शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उल्हास नदी उपोषण ठिकाणी जाऊन उपोषणकर्ते नितीन निकम यांची भेट घेतली व तसेच आपल्या मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवहानाला प्रतिसाद देत नितीन निकम यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून 5 जून पर्यंत नदी स्वच्छता झाल्यावर कल्याण डोंबिवली सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी प्यायला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments