ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत संपूर्ण देशाला अभिमानास्पद क्षण दिला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी श्रीमंत ढोल ताशा पथकाने दुबईतील स्टेडियमबाहेर दमदार वादन करत क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात अधिक रंग भरले.
भारताच्या विजयाने भारावलेल्या हजारो चाहत्यांनी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात संपूर्ण परिसर भारतमय झाला. उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी आनंदाने नृत्य केले, झेंडे फडकवत भारताचा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला.
या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाचा हृदयस्पर्श केला. अनेक माध्यम प्रतिनिधींनी आणि सोशल मीडियावरील चाहत्यांनी या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडिओ शेअर केले, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
श्रीमंत ढोल ताशा पथक हे केवळ एक वादन पथक नसून, भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरवशाली प्रचार करत आहे. भविष्यातही अशा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होत, भारताचा अभिमान वाढवण्याचा पथकाचा संकल्प आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments