ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिकून ॲडव्होकेट होऊन सध्या एमपीएसपीच्या परीक्षेची तयारी करत आहे. राहनाळ शाळेत माझे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन मी दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण करून एम.कॉम. झाले त्यानंतर मी वकिलीची परीक्षा पास झाले. आणि सध्या चौघुले कॉलेजमध्ये असिस्टंट प्राध्यापिक काम करत आहे. शिक्षणाचे बाळकडू मला जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळाले म्हणूनच मी उच्च शिक्षण घेऊ शकले असे प्रतिपादन हर्षदा भोईर हिने केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा राहनाळ, येथे "सन्मान महिलांचा" हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राहनाळ गावातील माजी विद्यार्थिनी हर्षदा भोईर तसेच ॲडव्होकेट प्रतीक्षा नाईक या दोन विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर निपुण भारत कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या माता पालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रतीक्षा नाईक हिने सांगितले की, वकील होण्यासाठी मला माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी मोठं सहकार्य केलं. सध्या मी भिवंडी कोर्टात प्राक्टिस करत आहे.
शिक्षिका रसिका पाटील यांनी सर्व उपस्थित महिलांना शिक्षण व आरोग्याचा मूलमंत्र दिला. संध्या जगताप यांनी आपल्या मुलांनाही मुलींची कामं शिकवा. मुलगा- मुलगी एक समान आहेत. मौलिक संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन काम माया सोनकांबळे यांनी केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments