Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

31 मे पर्यंत वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
महावितरण, महानिर्मिती व महापारेषण वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदावर व गरजेनुसार कार्यरत असलेल्या शोषित व पीडित वीज कंत्राटी कामगारांचे विविध कंत्राटदारां कडून होणाऱ्या आर्थिक सामाजिक व मानसिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारीची दखल वीज कंपनी प्रशासनाने गांभीर्याने घेतलीच पाहिजे व कंत्राटी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने मंगळवार दिनांक 18 मार्च  रोजी विधान भवनासमोर भव्यमोर्चा काढण्याचे ठरवले होते.

दि.6 मार्च  रोजी महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक मानव संसाधन  परेश भागवत तसेच मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि दि.13 मार्च रोजी अपर प्रधान सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये संघटना प्रतिनिधी यांची एक मीटिंग मंत्रालयात झाली. या मीटिंग मध्ये संघटनेने दिलेल्या पत्रातील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंपनी प्रशासनाने  विविध सकारात्मक पावले उचलली असल्याचे प्रधान सचिव  आभा शुक्ला यांनी सांगितले.

संघटनेने पत्राद्वारे मांडलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रलंबित समस्या शासन व वीज कंपनी प्रशासनाच्या वतीने लवकरच येत्या काळात पूर्ण करण्यात येतील. दोषी कंत्राटदारांवर योग्य व कठोर कारवाई केली जाईल. कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धती साठीचा हरियाणा पॅटर्न तसेच राज्यातील कंत्राटी कांमगारांच्या  किमान वेतन विषयी प्रलंबित असलेली वेतन वाढ हा विषय तसेच वीज उद्योगासाठी किमान वेतनाची  स्वतंत्र श्रेणी निर्माण करणे इत्यादी धोरणात्मक विषयासाठी शासनाच्या विविध अंगाशी संघटना व आपण एकत्रित संवाद साधून आगामी काळात या समस्या नक्कीच सोडवू
असे  आभा शुक्ला व परेश भागवत कार्यकारी संचालक महावितरण यांनी आश्वासित केले.

त्यामुळे संघटनेच्या सर्व केंद्रीय प्रमुख पदाधिकारी तसेच 36 जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी विधानसभेवरील भव्य मोर्चा तात्पुरता स्थगित करून शासन व प्रशासनाकडून प्रलंबित समस्यां लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी होकार दर्शवला व सध्या तात्पुरते हे आंदोलन 31 मे  पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी कळवले.

Post a Comment

0 Comments