Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तेज गणेशाचे

                        लेख : शुभांगी पासेबंद 

गृह खरेदी,विवाह ,दिवाळी ,महत्वाचे काम ,आर्थिक व्यवहाराचे काम असो की अन्य काही असो. सुरवात गणेश पूजनाने होते.त्यामुळे पहिला लेख गजान्नाला समर्पित करू या.हे शिवशंकर गिरिजा तनया, गणनायक प्रभुवरा! शुभकार्याच्या शुभ प्रारंभी,नमन तुला ईश्वरा! गणेशाला गणपती बाप्पाला, सर्व कामाचे शुभारंभ करताना नमस्कार केला तर कार्यनिर्विघ्न पार पडतं असं आजही मानले जाते.जुन्या काळाचे भूतकाळातील इतिहासातील मोहन जो दरो प्रमाणे या संस्कृती आढळल्या, त्यात देखील गणेशाचे पूजन आढळून येतं.भूतकाळ मागे सोडून नव्या तेजाला रोशनीला सामोरे जाण्याचा शुभारंभ, म्हणजे गणेश पूजन होय.गणेशाचे दर्शन म्हणजे रूबरू रोशनी होणे,तेजाला सामोरे जाणे.

 गणेश भक्त हे पूर्वीच्या काळापासून, परंपरेने आपण बघतो. पण हल्लीचे आधुनिक लोक, नवं मंडळी,गणपती बाप्पाला माय फ्रेंड गणेशा म्हणत मित्र मानतात. जवळचा स्नेही वाटणारा हा गणपती दुःख दूर करतो. सुख देतो. कृपा करतो. जुन्या कालच्या, सर्व काळाने संपवून टाकलेल्या गोष्टी मागे टाकून, नव्याचा शुभारंभ करायला शिकवतो.

 गणेशोत्सव आला की लोकांना गणपती आठवतं असं नाही.वर्षभर चतुर्थीला लोक पूजा करत असतात. वर्षभर,'तुज मागतो मी आता गजानना, मज द्यावे तू अनंता!' अशी आरती आर्तपणे म्हणत आपण एकदंताला आळवतो. गणपती बाप्पा कडे फक्त पारमार्थिक अध्यात्मिक मागण्या मागितल्या जातात, असं नाही. मित्राकडे ऐहिक मागण्या मागण्या, इच्छा सांगाव्या, असं गणपती बाप्पाशी फोनवर जणू काही कनेक्ट कम्युनिकेट करतो. वेळप्रसंगी बाप्पाला मोदक ची लालूच दाखवतो. 

रूप .......गणपती बाप्पाचे रूप भयावह नसतो. सौम्य मित्रवत असते. उदाहरणार्थ गणपती बाप्पाच्या वडिलांचं श्री शंकराचे रूप बघा गळ्यात नरमुंडाची माळा घालणाऱ्या स्मशान योगी असे रूप दरारा निर्माण करते.गणेशाचे तसे नाही.देवी जशी राक्षसाच्या डोक्यावर पाय ठेवणारी,थायथ्याट करत असते,असे गणेश बाप्पाचे नाही.गणेश बाप्पाचे वाहन उंदीर असतं. देवीकडे बघून, देवी वाहन सिंह देवीने शत्रूवर सोडलं तर त्या सिंह मार्फत देवी शत्रु वध करेल असा विचार आला की मनाला आधार वाटतो. पण सौम्य उंदरावर बसणारा गणपती बाप्पा हा बुद्धीची देवता आहे. शिवगण त्याचे आज्ञा मानत वावरतात. गणपती बाप्पा च्या समोर असलेल्या उंदरावरून मानवाने संगणकाच्या माऊसची संकल्पना शोधली असावी.बाप्पा ग्रेट आहे.उत्तम मॅनेजर आहे गणपती बाप्पा हा बुद्धीने शक्तिशाली बनला आहे. 

वाहन.....गणपती बाप्पाचे वाहन उंदीर आहे. कारण उंदीर हळूहळू दाताने कुरतडतो वाटेल त्या वस्तूचा धान्याचा नाश करू शकतो. उंदीर मामाला काळाच प्रतीक मानतात.. जो हळूहळू गोष्टी संपवतो नष्टत्वाकडे नेतो. अर्थात त्यासाठी काही काळ जावा लागतो.

 डोळे बारीक करून तीव्र निरीक्षण करून, दक्षता बाळगणारा, असा दोस्त बाप्पा जणू आपल्या तुंदील तनु मध्ये लंबोदरा मध्ये पोटामध्ये सर्व सामावून घेतो. प्राप्त परिस्थितीचा दृष्टा स्वीकार करावा. योग्य वेळ अथवा काळ येता न्याय असा निर्णय घेतला जाईल,हा विचार बाप्पा कडून मिळतो. अनेक संकट वेदना निसर्गाचे प्रकोप या काळी बाप्पा धीर देतो. हेही दिवस जातील असं सुचवतो.पोट मोठे असूनही गणेश बाप्पा सुस्त नाही.तो सतत चालत राहतो.उंदीर वाहन असूनही तो मंदगती नाही. हुळहळ्या वळवळया असून तो भक्त  संकटी धावून जातो.

 एका लोक नृत्य मध्ये,'आऊश याची खिल्लारी, बापूस झटिया रे! फाडफाड्या कानाचं,भारी हळूहळये!'

असे वर्णन केले आहे. गणपती बाप्पाच्या तुंदिल तनु सावरत धावणाऱ्या रूपाला चंद्र हसला होता त्यामुळे रागावलेल्या गजाननाने,चंद्राला शाप दिला की तुझं तोंड लोक बघणार नाहीत.चंद्र घाबरला. गणेशाने उदार मनाने चंद्राला माफ केलं आणि सांगितलं फक्त भाद्रपद गणेश चतुर्थीलाच तुझे दर्शन घेणार नाहीत,बाकी दर महिन्याच्या चतुर्थीला भक्तगण  तुझे दर्शन घेऊन उपवास सोडतील. म्हणजे बाप्पा पटकन क्षमा करतात.

 भाबड्या स्वभावाचा आणि कुरकुऱ्या नसल्यामुळेच गणेश बाप्पाला आपण मित्रासारखं, पाहुण्यासारखे दहा दिवस घरी बोलवतो. त्याचे लाड करतो, उत्सव साजरे करतो आणि जड मनाने निरोप देतो.

 गणेश पूजनाने  व्यक्ती संतुलित विचार करते. मस्तकाची थरथर अथवा चंचलता अथर्वशीर्षाच्या पठणाने थांबते.संतापावर नियंत्रण जमते. दुर्वांच्या सेवनाने उष्णता कमी होते. हल्ली तत्काळ सगळं इन्स्टंट हवं,अशा जमान्यात सुद्धा गणपती बाप्पा मित्रवत वागतो. लगेच काही मिळणार नाही तत्काळ काही मिळणार नाही, डोकं शांत ठेवावे लागेल असे व्यवस्थापन  गणपती बाप्पा शिकवतो.

 बुद्धी वापरून,द्रष्टा स्वीकार करणे हे शिकवणाऱ्या बाप्पा सांगतो की शीघ्र फलदायी असं गणेशाचे व्रत नाही.

 व्यासांनी सांगितलेले महाभारत गणपती बाप्पा ने लेखणीने लिहून घेतलं.जणू काही गणपती बाप्पा स्टेनो शॉर्ट हॅन्ड रायटर होते. जसे आहे तसेच स्पष्ट सांगून,वैचारिक स्पष्टता वेगळ्या विचाराने वागणे गणेश बाप्पा शिकवतात. खूप मोठी आश्वासन नाहीत,पण एका तेजाला समोर जाऊन तो तेजाचा अंश भक्ताला स्वतःत भरून घेता येतो. गणेश बाप्पाच्या फेसबुक पेजवर, रिलेशनशिप स्टेटस मध्ये,फ्रेंड्स फोरेवर,गाईड फॉर एव्हर,असं लिहावं असं मला वाटू लागलंय. पौराणिक विचार आपण नेहमी वाचतो. पण मला हा नवा विचार स्पर्शून गेला..

 तेजाला समोर जाऊन मी रूबरू रोशनी झाले. तेज गणेशाचे मनात भरून आले.

गणपती बाप्पा मोरया.

**

Post a Comment

0 Comments