ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अखिल भारतीय साहित्य परिषद व बिर्ला महाविद्यालय हिंदी विभागाच्या वतीने 'वसंत पंचमी' निमित्त साहित्यिक मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख हे होते.
या साहित्यिक मेळाव्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी,आंबिवली, येथिल साहित्यिकांबरोबर बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. कृति पांडेय यांनी गायलेल्या सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. उपस्थित साहित्यिकांनी देवी सरस्वती, वसंत ऋतू व कवी निराला यांच्यावरील संदर्भातील आपल्या रचना सादर केल्या. अर्णा मिश्रा हिने देवी सरस्वतीवरील एक संस्कृत सुक्त अस्खलितपणे म्हंटले व त्याचा अर्थ सांगितला. कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रख्यात उर्दू शायर अफसर दख्खनी यांनी उपक्रमाचे कौतुक करुन मराठी व हिंदी भाषिक एकत्रितपणे असा कार्यक्रम आयोजित करतात याबद्दल आनंद व्यक्त केला व आपली एक गझल प्रस्तृत केली.
कार्यक्रमात कवी परमजीत सिंह, डॉ. चंद्रशेखर भारती, उज्वला लुकतुके, सतीश केतकर, नंदा कोकाटे, सत्यभामासिंग, अश्विनी मुजुमदार, फोटोग्राफर व पत्रकार सुभाष जैन, मकरंद वांगणेकर, सुनील म्हसकर, प्राजक्ता कुलकर्णी, रघुनाथ पाटील, डॉ. दुर्गेश दुबे, नागेश पवार व इतर ४० साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण इकाई चे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर पाण्डेय व प्रांत मंत्री संजय द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था सुमिता भोसले व बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली.
Post a Comment
0 Comments