Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ज्ञान विकास संस्थेतर्फे सुनील म्हसकर सर यांचा सन्मान

                  ब्लॅक अँड व्हाईट नवी मुंबई वार्ताहर 

सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई, कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेच्या वतीने थोर समाजसुधारक, विधीतज्ञ व शिक्षण महर्षी ऍडवोकेट पी.सी.पाटील साहेब यांच्या शुभहस्ते शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदान दिल्याबाबत सुनील म्हसकर सर यांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव रमेश वेटा साहेब, जेष्ठ संचालक बळीराम म्हात्रे साहेब, प्रशासकीय अधिकारी रामदास बिडवे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा पाटील मॅडम, मुख्याध्यापक दळवी सर, सहशिक्षक व साहित्यिक संतोष जाधव सर, स्कॉलरशिप विभाग प्रमुख प्रदीप म्हात्रे सर व सारिका देशमुख मॅडम, शरद बोडके, शरयू तांबडे आदी शिक्षक बंधू-भगिनी तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते. 

सुनील म्हसकर सर हे शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संचालित सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दूंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुनील म्हसकर सर हे ठाणे जिल्ह्यातील एक उपक्रमशील व हाडाचे शिक्षक असून ते ग्लोबल टीचर्स अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित आहेत. सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उल्हासनगर या केंद्रातून शिक्षणशास्त्र या विषयात पीएचडी करत आहेत. सुनील म्हसकर यांस आजतागायत त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबाबत त्यांस अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

ज्ञानविकास संस्था ही नवी मुंबईतील एक नामांकित शैक्षणिक संस्था असून तळागाळातील, झोपडपट्टीतील व शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था वेळोवेळी विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी, २०२५ मध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी सुनील म्हसकर सर यांचे मार्गदर्शनपर व प्रेरणादायी असे व्याख्यान आयोजित केले होते. ज्ञानविकास संस्थेतर्फे सदर सन्मान प्राप्त झाल्याने सुनील म्हसकर सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments