ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोटक एड्युकेशन फाउंडेशन च्या अंतर्गत मराठी शाळांमधील शिक्षकांसाठी लिडरशिप विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ठाणे जिल्ह्यातील ५० शाळांची निवड करण्यात आली. यात कल्याणातील नामवंत श्री गजानन विद्यालय या शाळेची निवड झाली. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून कोटक एजुकेशन फाउंडेशन आणि श्री गजानन विद्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गजानन विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक नुकताच वैयक्तिक दृष्टी आणि शाळेची सामायिक दृष्टी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत तज्ज्ञ सुलभक सुमित कांबळे,
प्रशिक्षण घेतलेले मार्गदर्शक मुख्याध्यापक व शिक्षक ,संस्था पदाधिकारी,सर्व शिक्षकवृंद, उत्साही पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरवातीला प्रशिक्षक म्हणून असणाऱ्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका
कांचन भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कांचन भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यानंतर प्रशिक्षक धर्माधिकारी यांनी सर्वांचे खेळ घेवून कार्यक्रमातील सहभाग बळकट केला. प्रशिक्षक आशा पिंपळे यांनी अतिशय सुरेख गाण्यातून पर्यावरण गीत घेतले. यानंतर सुमित कांबळे यांनी सुंदर अश्या संवाद सत्रातून आपली शाळा आणि त्यातील आवडत्या गोष्टी आणि आपले ध्येय हे विषय मांडले. ७० जणांच्या या कार्यशाळेत तज्ञ कांबळे आणि प्रशिक्षक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी गट विभागणी करून वैयक्तिक आणि शाळा विकास यावर आधारित चार डोमेन वर गट कार्य घेतले. या गट कार्याच्या माध्यमातून आपल्याला पुढील पाच वर्षांत करायच्या गोष्टी सहज स्पष्ट केल्या.
चार तासाच्या या कार्य शाळेत सर्वांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. या नंतर प्रशिक्षक रोहिणी भालेराव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शित करून कार्य शाळेची सांगता केली. संस्थेच्या संस्थापिका प्रतिभा भालेराव आणि संस्थेचे सचिव केदार पोंक्षे यांनीही कार्य शाळेत उत्साहाने सहभाग घेतला आणि शेवटी अनमोल अभिप्राय दिला. या कार्यशाळेतून प्रत्येकाने आपले वैयक्तिक दृष्टी तर बनविलेच पण त्याबरोबर सर्वांनी एकत्रित रित्या शाळेचे सामायिक दृष्टी तयार केले ही या कार्यशाळेतील आकर्षणाची गोष्ट ठरली.
Post a Comment
0 Comments