ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
केंद्रसरकार तर्फे सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांचे नंबर प्लेट बदलण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जुन्या नंबर प्लेट काढून नवीन अति सुरक्षित पंजीकृत पाटी (हाई सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) लावण्याची सक्ती केली जात आहे. या करीता जे दर ठरविण्यात आलेले आहेत ते इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत.
याबाबत सार्वजनिक वाहन (रिक्षा- टैक्सी) धारकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर रूपेश भोईर यांनी शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे, उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा क्षेत्रचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे, वाहतुक सेनेचे शहर अध्यक्ष निलेश भोर यांच्या बरोबर एक तातडीची बैठक घेतली आणि सर्वांच्या सहमतीद्वारे कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आशुतोष बारकुले यांना एक पत्र देऊन एचएसआरपीचे दर कमी करण्यासाठी विनंती केली.
बारकुले यांनी सदर पत्र संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले. ह्या बद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना रूपेश भोईर यांनी सांगितले की आम्ही एचएसआरपी च्या विरोधात नाही, पण प्रत्येक वेळी केंद्र सरकार महाराष्ट्रा कडून इतर राज्या पेक्षा खूपच जास्त आर्थिक वसूली करायचे धोरण राबवते त्याला आमचा विरोध आहे. आम्ही ह्या विषया बद्दल राज्याचे परिवहन मंत्र्यांना सुद्धा लेखी पत्र दिला आहे. जर दर कमी नाही केले तर शिवसेना स्टाइलने आन्दोलन करण्यात येईल असा इशारा रूपेश भोईर यांनी दिली आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देते वेळी रूपेश भोईर यांच्या सोबत वैभव भालेकर, अरशद शेख, विजय बोरे, संदीप पंडित, प्रशांत जाधव, रहिम चौधरी आणि इतर कार्यकर्ता उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments