वंजारी समाजातील नवोदित कवी यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं तसेच त्यांना काव्य विषयक मार्गदर्शन साहित्य विषयक मार्गदर्शन करून अशा नव-कवींना,लेखकांना प्राथमिक धडे देऊन सारस्वतांच्या मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्यावतीने राज्यस्तरीय मराठी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक कवींनी आपल्या स्वालिखित दोन कविता, पासपोर्ट साईज फोटो व अल्पपरिचयासह संयोजक प्रा अर्जुन उगलमुगले ८८५०३७८५६९ किंवा रमेश आव्हाड ९८७०३३४४५१ या क्रमांकावर पाठवाव्यात. आलेल्या कवितांपैकी पारितोषिक पात्र कवितांना संस्थेच्या बांधिलकी या वार्षिक अंकात प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तसेच यातील निवडक कवितांचा प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
स्पर्धे करिता प्रथम क्रमांकास २१०० रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच द्वितीय क्रमांक १५०० रुपये रोख व सन्मान चिन्ह आणि तृतीय क्रमांकास ११०० रुपये रोख व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ पाच कवींना ५०० रुपये रोख सन्मानचिन्ह असे पारितोषिके देण्यात येणार असून परीक्षकांना लक्षवेधी वाटलेल्या पाच कवितांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी दिनांक १० मार्च २०२५ पर्यंत आपल्या कविता पाठवाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले असून स्पर्धेकरिता कोणतेही प्रवेश मूल्य नसून स्पर्धा विनामूल्य आहे.
Post a Comment
0 Comments