Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या अ प्रभागाचे माजी सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

 

केडीएमसीच्या अ प्रभागाचे माजी सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील अ प्रभागाचे यापूर्वीचे  सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना अनाधिकृत बांधकाम रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत निलंबन कारवाई करण्यात आल्याने अनाधिकृत बांधकाम रोखण्यात जे सहाय्यक आयुक्त कामयाब होणार नाही त्यांची आता खैर नाही असे यानिमित्ताने चित्र दिसत आहे.

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील 65 इमारतींचा रेरा घोटळा अनाधिकृत बांधकाम प्रश्नावरून न्यायालयाने केडीएमसीला फटकारले असल्याचे समजते. जागृत झालेल्या प्रशासनाने अनाधिकृत बांधकामे पाडण्याच्या धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील अ  प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कारकिर्दीत अनाधिकृत बांधकामाचे पेव अ प्रभाग क्षेत्रात पेव फुटले. टिटवाळा रिंग रोड लगत इंदिरा नगरगणेश नगरबल्याणी, उभर्णीमोहीलीगाळेगावमोहने, अटाळीआंबिवलीबंदरपाडाशहाड आदि परिसरात वाढत्या अनाधिकृत बांधकामा प्रश्नी तक्रारीपाहता सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी थातुरमातुर कारवाई करीत एक प्रकारे कानाडोळा केला.

याबाबत आयुक्त इंदू राणी जाखड यांनी देखील अनाधिकृत बांधकामावर ठोस कारवाई  करा अशी समज संदीप रोकडे यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. पंरतु यातून त्यांनी बोध न घेता. कागदीखेळ रंगविण्यात वेळ घालवला. अशातच त्यांची बदली झाली. आणि अखेर अ प्रभागातील अनाधिकृत बांधकाम प्रश्नी त्यांच्यावर ठपका ठेवित अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासहीनिशी संदीप रोकडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. 


Post a Comment

0 Comments