ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे महाराष्ट्रातील 45 वयाखालील युवा कामगारांचे संमेलन शिवशंकर सभागृह पुणे येथे संपन्न झाले. या संमेलनास महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातून व विविध उद्योगातून 958 पुरुष व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय राजबिहारी शर्मा, प्रदेशाचे अध्यक्ष अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, प्रदेशाचे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
उद्घाटन सत्रामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा यांनी भारतीय मजदूर संघाची रीती आणि नीती व त्यामध्ये तरुणांच्या सहभाग या विषयावर कामगारांना मार्गदर्शन केले तसेच किरण मिलगीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दुसऱ्या सत्रामध्ये 2047 चा विकसित भारत व त्यामध्ये युवा कामगारांची भूमिका व योगदान, याविषयी मार्गदर्शन प्राध्यापक नारायण गुणे अर्थतज्ञ यांनी युवा कामगारांसमोर मांडले. 2047 साली आजचे युवक हे खऱ्या अर्थाने या सगळ्या विकसित भारताचे शिल्पकार असणार आहेत. त्यामुळे याची जाणीव ठेवून युवा कामगारांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सत्राचे सूत्रसंचालन भारतीय मजदुर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी केले.
समारोपाच्या सत्रामध्ये भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी कामगार कायद्यातील योग घातलेली बिल व त्या संदर्भात भारतीय मजदूर संघाची भूमिका जे लेबर कोड हे कामगारांचे हिताचे आहेत. त्याचे मजदूर संघ स्वागत करतो आहे व ज्या बिलांमध्ये कामगारांचे नुकसान आहे, त्यामध्ये दुरुस्त्या करणे आवश्यक आहे.
Post a Comment
0 Comments