ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
इनरव्हील क्लब ऑफ कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ अंतर्गत लक्ष्मीनारायण हॉल, टिळक चौक, कल्याण पश्चिम येथे आयोजित भागवत सप्ताहाची रविवारी सांगता झाली.
भागवताचार्य वासंती केळकर यांनी आपल्या सुमधूर वाणीत भागवत कथन केले. संपूर्ण आठवडा चैतन्यमय वातावरण होते. प्रचंड उत्साहाने सर्व नागरिक रोज या भागवत सप्ताहास हजर राहत होते. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, माजी आमदार नरेंद्र पवार, अनंत हलवाईचे प्रफुल्ल गवळी, डॉ प्रशांत पाटील, सीए महेश भिवंडीकर अशा अनेक मान्यवरांनी देखील या भागवत सप्ताहात उपस्थिती दर्शविली.
इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या सर्व सभासद तसेच कल्याण संस्कृती मंचचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम अत्यंत सुरेखरीत्या पार पडला. भागवताचार्य वासंती केळकर, उपस्थित नागरिक, मान्यवर तसेच या कार्यक्रमास विशेष आर्थिक सहकार्य करणाऱ्या अनंत हलवाई या सर्वांचे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉ. अर्चना सोमाणी, सचिव अॅड. नीता कदम, प्रकल्प प्रमुख अॅड. अर्चना सबनीस, स्वागतयात्रा प्रमुख मीनाक्षी देवकर तसेच कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments