Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अर्थ संकल्पात टॅक्स संदर्भात मोठी घोषणा


१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, परंतु ४-८ लाख रूपयांवर कर लागू ?

             ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा 

अर्थ संकल्पात टॅक्स संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये सामान्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. अशातच नोकरदार आणि सर्वसामान्य जनतेसाठी देखील त्यांनी एक घोषणा केली आहे.

निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, याचा फायदा केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांनाच मिळणार आहे. या कर प्रणालीबाबात लोकांच्या मनात काही संभ्रम आहे. कारण टॅक्स स्लॅब ८ - १२ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारण्यात येणार आहे. अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त कसे?

अशा प्रकारे तुम्हाला मिळेल सूट

अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली आहे. मात्र, तुमची कमाई १२ लाख रूपयांपेक्षा जास्त असेल तर, तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. एकूण ४ लाख रूपयांवर कोणताही कर लागू होणार नाही. ०-४ लाखांपर्यंतच्या इन्कमवर कोणताही कर लागू होणार नाही. मात्र, ४ लाख रूपयांवर ५% कर आकारला जाईल.

नोकरदार लोकांसाठी अधिक फायदे

अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले की, नोकरदार लोकांना स्टँटर्ड डिडक्शनसह १२.७५ लाख रूपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

नवीन कर स्लॅब

१२ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही

०-४ लाख रूपयांच्या उत्पन्नावर शून्य कर.

४-८ लाख रूपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर.

८-१२ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर.

१२-१६ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर.

१६-२० लाख रूपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर.

२०-२४ लाख रूपयांच्या उत्पन्नावर २५ टक्के कर.

२४ लाखांहून अधिक रकमेवर ३० टक्के कर.

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे सरकारद्वारे माफ केलेले कर. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रूपयांपर्यंत असेल, तर सरकार इन्कम टॅक्स रिबेटद्वारे १२,५०० रूपयांपर्यंतचे इन्कम टॅक्स माफ करू शकेल. अशा परिस्थितीत ५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कारण या उत्पन्न मर्यादेवरील कर सवलतीच्या श्रेणीत येते. त्यामुळे सरकार कर माफ करते.

ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना (New Tax Regime Updates 2025) लागू होणार आहे. जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.

नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरविली होती. आधीपासूनच म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरील कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्याने या करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टिमच ठेवली होती. हे करदाते जुन्या प्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर येण्यासाठी सीतारामण यांनी नवीन खेळी खेळली आहे.

यामुळे आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणताही सूट देण्यात आलेली नाही. त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

२,५०,००० रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य आयकर भरावा लागणार आगहे. तर २,५०,००१ ते ५,००,००० रुपयांदरम्यान - ५% टक्के, ५,००,००१ ते १०,००,००० उत्पन्न असलेल्यांना २०% व १०,००,००० पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ३०% कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आता कर दात्यांना स्विच व्हावेच लागणार आहे.

Post a Comment

0 Comments