Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणात परप्रांतीयांकडून पुन्हा मराठी माणसांची छळवणूक

 

मराठी माणसांच्या जागा हडप करण्याचा कुटील डाव खेळला जात आहे.

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील कासार हाट ह्या परिसरात शेकडो वर्षांपासून मराठी माणसांची वस्ती आहे.विशेषतः शिवाजी चौकापासून पुढे शंकरराव चौक,अहिल्याबाई चौक,टिळक चौक,पारनाका,गांधी चौक,कासार हाट,लेले आळी,सिद्धेश्वर आळी,अशी सर्व गल्लीबोळ हे मराठी माणसांचे वाडे आणि घरे असलेला भाग.ह्याच भागात इतिहास कालीन सुभेदारवाडा,साठे वाडा अशी अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेली घरे,आणि कुटुंबं राहत असलेले वाडे आता कालांतरानं हळू हळू नामशेष होत चालली आहे.ह्याच परिसरात फार पूर्वी पासून गुजराती,जैन मारवाडी समाजाने व्यापाराच्या माध्यमातून बस्तान बसविले आणि हळू हळू ह्या भागातील जुने वाडे किंवा त्या वाड्यातील खोल्या विकत घेऊन ,कालांतराने हे वाडेही विकत घेतले.आता ह्या परिसरात जैन मारवाडी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून,त्याचाच परिणाम म्हणून एका जुन्या वाड्याची जागा,एका चाळीची जागा,आणि महाडकर ट्रस्ट ची जागा ,अमृते बिल्डिंग,जोशी चाळ ह्या जुन्या वास्तूंचे   पुनर्निर्माण करण्यासाठी येथील रहिवाशांना सदर जागेत नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी आठ दहा वर्षांपूर्वी घेतली होती, परंतू आज पर्यंत सदर जागेच्या ठिकाणी कोणतेही बांधकाम केले नाही.वरील जागे मधील रहिवाशांना बांधकाम होय पर्यंत इतर ठिकाणी भाड्याने राहावयास सांगितले,परंतु त्याचे भाडेही दिले जात नसल्याने,आणि सदर जागेवर कोणतेही विकास काम अजूनही होत नाही.वरील ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना आता स्वतःचे घरही नाही आणि विकासक भाडेही देत नाही.जुना वाडा  आणि चाळ ह्या वास्तू महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून,धोकादायक इमारत /वास्तू म्हणून पाडून टाकले.आता हे रहिवाशी गेली आठ दहा वर्ष त्या ठिकाणी आपले घर मिळेल ह्या आशेवर वाट बघत बेघर होऊन बसले आहे.स्वतःच्या हक्काच्या घरासाठी हे रहिवाशी वणवण फिरत आहेत.

ललित जैन ह्या विकासकाने सदर जागेचा ताबा घेऊन त्या जागेला पत्र्याचे कुंपण घालून घेतले आहे.आणि त्या जागेचा स्वसमाजाच्या धार्मिक कार्यासाठी उपयोग सुरू केला असून,तेथील रहिवाशांनी ह्या बद्दल जाब विचारला असता त्यांना धमकवण्यात असेल असल्याचे समजते आहे.ह्या घटनेच्या संदर्भात विकसकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून एक प्रकारे ह्या विकासकाला अभय दिल्याचे दिसते आहे.ह्या मराठी रहिवाशांना आता न्याय कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.


=============

Post a Comment

0 Comments