ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅपी स्ट्रीट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत वसंत व्हॅली, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे पार पडणार आहे.
नागरिकांसाठी खास आकर्षण
‘हॅपी स्ट्रीट’ हा केवळ कार्यक्रम नसून एक चळवळ आहे, ज्यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक आणि आरोग्यदायी उपक्रमांचा लाभ घेता येईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी खास आकर्षणे म्हणजे –
योगा आणि झुंबा डान्स आरोग्यासाठी उपयुक्त तसेच ऊर्जादायक शारीरिक क्रिया
- वाद्य आणि गाणी – संगीतप्रेमींसाठी खास सादरीकरण
-नृत्य सादरीकरण – विविध प्रकारच्या नृत्य शैलींचे सादरीकरण
- फेस पेंटिंग आणि अक्षर गणपती पेंटिंग – कलाकारांसाठी कला प्रदर्शनाची संधी
‘हॅपी स्ट्रीट’मध्ये लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही खास असणार आहे. कुटुंब, मित्रपरिवार आणि शेजारी-पाजारी यांच्यासह हा कार्यक्रम अनुभवता येईल.
या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्यदायी सकाळी मोकळ्या वातावरणात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक थांबवून, नागरिकांसाठी हा मुक्त आनंदोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments