ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बिर्लोत्सव, ह्या आंतरमहाविद्यालयीन फेस्टमध्ये बी.के. बिर्ला कॉलेज उजळून निघाले. कॅम्पसमध्ये एक जादूई टच देणारी ‘एन्चेंटेड एस्केपेड’ ही फेस्टची थीम होती. या फेस्टमध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न 40 हून अधिक शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला. यावेळी गायन, फॅशन शो, ग्रुप आणि सोलो डान्स, मॉन्टेज, टी-शर्ट पेंटिंग, एकपात्री-अभिनय, लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये हिंदुजा कॉलेज, जय हिंद कॉलेज, सोमय्या कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज, रुपारेल कॉलेज आणि खालसा कॉलेज अशा विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे 5000 कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम आदित्य बिर्ला-ग्रासिम इंडस्ट्रीजने प्रायोजित केला होता.
प्रसिद्ध हिंदी आणि मराठी मालिका अभिनेत्री आणि महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा वाघ हिने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संचालक (शिक्षण) डॉ.नरेशचंद्र, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील आदी मान्यवरांनी उपस्थितांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. दिवसभर चाललेल्या स्पर्धांनंतर, कार्यक्रमाचा समारोप विशेष दिमाखात संपन्न झाला. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना सुमारे चार लाख रुपयांची पारितोषिक रक्कम वाटप करण्यात आली. याप्रसंगी के.डी.एम.सी. आयुक्त डॉ.इंदू राणी जाखर, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर.चितलांगे यांनी विजेत्यांना बक्षीस दिले.
प्रसिद्ध हिंदी गायक शिवम चौहान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कला मंडळाच्या अध्यक्षा आकांक्षा ठाकूर व महाविद्यालयातील कला मंडळ आणि इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मल्टीमीडिया आणि जनसंवाद विभागाचे विद्यार्थी निखिल कुमार आणि अंकिता सिंग यांनी सूत्रसंचालन केले. अरनॉल्ड जथाना, सहायक प्राध्यापक, व्यवस्थापन अभ्यास विभाग आणि आकाश कांबळे सहायक प्राध्यापक, संगणकशास्त्र विभाग यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments