ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
त्यागमूर्ती माता रमाई मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उंच विद्वत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचले असे प्रतिपादन प्रा.डॉ.आर.आर कसबे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा नालंदा बुद्ध विहार सम्राट अशोक नगर उंबर्डे कल्याण पश्चिम येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ व्या जयंती निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून रमाई कादंबरीकार केंद्रीय शिक्षिका लता शिंदे, शाखेचे अध्यक्ष राजू काऊतकर, प्रतिभा शिरसाट, स्वाती आघाम, कविता काऊतकर, वैशाली गोंडगे, सुंदर काऊतकर, ऍड.आम्रपाली भालेराव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ.आर.आर. कसबे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संपूर्ण जीवनावर विविध पैलूवर भाष्य करत सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय मगरे, रोशन गायकवाड, शरद गोंडगे, रंगोली मोरे, सुनीता गोंडगे, कोमल वाटुरे, मंगल वाघमारे, आरती मगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सर्व उपस्थितांचे प्रतिभा शिरसाट यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments