Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ. विजय महाजन आंतरराष्ट्रीय लेवा आयकॉन् पुरस्काराने सन्मानित

 

                ब्लॅक अँड व्हाईट (विशेष)

डॉ. विजय भास्कर महाजन यांचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून, जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने घडलेला आहे. त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतून केली आणि पुढे प्रवरानगर लोणी येथून पॉलिटेक्निकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, त्यानंतर सोमय्या महाविद्यालयातून यांत्रिकी पदविका आणि अंधेरीतील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी, मास्टर आणि तंत्रज्ञान विषयात पीएच.डी. पूर्ण केली. हा संपूर्ण प्रवास अत्यंत आव्हानात्मक असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही.त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात यावल सूत गिरणीत साइट इंजिनियर म्हणून केली आणि पुढे मुंबई म्हाडामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात शासकीय तांत्रिक विद्यालयात शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि पुढे मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकारी, राज्य समन्वयक (PPP व वर्ल्ड बँक प्रकल्प) म्हणून कार्य केले. 

शासकीय तांत्रिक विद्यालय उल्हासनगर येथे विद्यार्थ्यासाठी अतिशय अभिनव उपक्रम राबविले व गरीब , होतकरू विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला .आणि ग्रामीण व आदिवासीं भागातील गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जनजागृती शिबिर आयोजन तसेच विद्युतीकरण, जल बंधारे शाळांची रंगरंगोटी अशी कामे केली. तसेच राज्यात पहिली आयएसओ ९००१:२००० संस्था नोंदणी केली,  राष्ट्रीय स्तरावरील NCERT उत्कृष्ट संस्था नावारूपास आणली. अतुलनीय आणि उल्लेखनीय कामगिरी साठी मा पंतप्रधान पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस २००८-०९ यावर्षी शासनातर्फे करण्यात आली होती.

 त्यांनी मागील २५ वर्षांत अनेक माननीय मंत्र्यांचे स्विय सहाय्यक व विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून मंत्रालयात विविध खात्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले. 

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव अनेक नामांकित पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्मिळ ऐतिहासिक चित्रांचे जतन करून त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार रझा, वासुदेव कामत, गायतोंडे, एम एफ हुसेन, धुरंधर, पदमसी, अतुल दोडिया  अशा ख्यातनाम चित्रकारांची  १८६० पासून  उपलब्ध अप्रतिम चित्रे सामील होती.त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ठाणे जिल्ह्यात दोन अत्याधुनिक शैक्षणिक संकुलांची स्थापना केली. यात बदलापूर येथील भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयटीआय तसेच बापसई, कल्याण येथील इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचा समावेश आहे, जिथे अभियांत्रिकी, फार्मसी, पॉलिटेक्निक, आयटीआय, मॅनेजमेंट आणि शाळा शिक्षणाचा समावेश आहे. त्यांनी वडिलांच्या नावाने संस्था स्थापन करून ते  स्व. भास्करराव महाजन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, कल्याणचे संस्थापक अध्यक्ष असून सध्या इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक आहेत.

संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

डॉ. महाजन यांचे शिक्षणाबरोबरच संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक संकुलांमध्ये IoT, Robotics, 3D Printing, AI, Data Science, Industry 4.0 यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांना उद्योगानुकूल कौशल्ये आणि स्टार्टअपसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी Indala Innovation, Incubation, and Research Center ची स्थापना केली. यामुळे विद्यार्थ्यांसाठी सशक्त आधार प्रणाली निर्माण केली असून, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.

शेती आणि ग्रामीण विकासात विशेष कार्य आहे.

डॉ. महाजन यांचे डोंगर कठोरा येथील अ. ध. चौधरी विद्यालयातून १०वीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे मूळ गाव कोसगाव असून सध्या कल्याण आणि न्हावी (ता. यावल) येथे वास्तव्य आहे. त्यांना शेतीची विशेष आवड असल्याने त्यांनी सातोद, कोळवद, न्हावी, कठोरा, हंबर्डी येथे आधुनिक पद्धतीने शेती विकसित केली आहे. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी आणि कृषिपूरक व्यवसायांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत.

प्रतिष्ठित पुरस्कार व जागतिक सन्मान

शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना ५२ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. काही महत्त्वाचे पुरस्कार त्यानां प्राप्त झाले आहेत,

राष्ट्रीय NCERT उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००२

राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (मा. मुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते) २००९ राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार – राज्यस्तर पहिले पारितोषिक (₹५ लाख) (मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या हस्ते) २००८.

आता त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल ग्लोबल लेवा पाटीदार फाउंडेशन, जळगाव यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार  *लेवा आयकॉन* म्हणून गौरव करण्यात आला,  त्यामध्ये कल्याण येथील *डॉ विजय भास्कर महाजन*  यांचा लेफ्टनंट जनरल श्री जगदीश चौधरी यांच्या हस्ते व आ. एकनाथराव खडसे, आ राजुमामा भोळे सदर पुरस्कार प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान १०० व्यक्तींना देण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच नेस्को इंटरनॅशनल बिझनेस सेंटर, गोरेगाव, मुंबई येथे शानदार संपन्न झाला .  

सदर कार्यक्रमाचे आयोजक आणि मुख्य संकल्पना असलेले ग्लोबल लेवा फाउंडेशन चे सर्वसर्वा श्री धनंजय कोल्हे यांनी मागील ३ वर्षापासून अतिशय परिश्रम घेऊन प्रतिभावंत लेवा रत्नाची अथवा लेवा आयकॉन निवड करून असा सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन व आयोजन करून उत्कृष्ट व्यवस्थापन केले त्याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. याप्रसंगी  दृष्ट लागणारा १०० व्यक्तीचा परिचय आणि कार्याचा लेखा जोखा असलेला गौरव ग्रंथाचे देखील  मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले ...

भविष्यातील ध्येय आणि नव्या योजना

डॉ. महाजन यांनी विद्यार्थ्यांसाठी अभिनव योजना आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भविष्यात Deemed University आणि वैद्यकीय शिक्षणाचा एक प्रकल्प हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी ते सातत्याने कार्यरत राहणार आहेत.

डॉ. विजय भास्कर महाजन यांच्या अथक परिश्रम, नेतृत्वगुण, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे "LEWA ICON" पुरस्कार हा त्यांच्यासाठी अत्यंत योग्यतेने मिळालेला सन्मान आहे. त्यांच्या उज्ज्वल कार्याचा आणि समर्पित प्रवासाचा हा गौरव संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे.यासोबतच आपल्या खानदेशातील महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावे असलेला बहिणाई ट्रस्टने त्यांना आंतरराज्य बहिणाई गौरव  पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास समाजाच्या विविध थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments