ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
इयत्ता १२ वीची परिक्षा राज्यभर सर्वत्र सुरु झाली आहे. या १२ वीच्या परिक्षेच्या पार्श्वभुमीवर परिक्षेत होणाऱ्या कॉपीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी मारुती जाधव, माधुरी आयनोर, सहा. कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील लुड्स हायस्कुल, नॅशनल ऊर्दु जुनिअर कॉलेज, मोहिंदर सिंग काबुल सिंग जुनिअर कॉलेज, सेंट झेविअर जुनिअर कॉलेज, बिर्ला महाविदयालय या महाविदयालयांना परिक्षा कालावधीत समक्ष भेट देऊन संबंधित महाविदयालयातील प्राचार्यांशी चर्चा केली.
१२ वीच्या परिक्षा कालावधीत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १२ वीच्या परिक्षांचे केंद्र असलेल्या महाविदयालयांची फिरत्या पथकामार्फत सातत्याने पाहणी केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
Post a Comment
0 Comments