डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे
महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा
आरोप
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात महिलेची सिझर प्रस्तुती झाल्यानंतर बाळाला जन्म दिला. पण काही तासात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला.
मिळालेल्या माहितीनुसार अविनाश सरोदे यांच्या पत्नीला प्रस्तुतीसाठी 20 फेब्रुवारी तारीख दिली होती. पंरतु डॉक्टरच्या सांगण्यानुसार तिला 11 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 12फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी सिझेरीग शस्त्रक्रिया त्या महिलेवर केली. सुवर्णा हिस मुलगा झाला. परंतु तिची प्रकृती खालवली. या संदर्भात पतीने डॉक्टरांना सांगितले, डॉक्टरांनी ती लवकर बरी होईल. रक्त चढावावे लागेल असे सांगितले. दरम्यान एक आया मावशी एक पिशवी घेऊन जात असल्याचे मयत महिलेच्या पतीने पाहिले असता त्याने विचारले असता त्या महिलेची पिशवी काढले असल्याचे समजले.
त्यानंतर तिला सायन येथे हालवावे लागेल असे सांगण्यात आले. नंतर येथे जवळच्या रूग्णालयात दाखल करा असेही सांगितले गेले. ती रिकव्हर होईल असे सांगितले, आणि काही तासानंतर ती मृत्यू पावली असल्याचे सांगितले. यामध्ये डॉक्टरांनी मृत्यू झालेल्या महिलेची गर्भाशयाची पिशवी न विचरता काढलीच कशी असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी करीत डॉक्टरच्या हलगर्जीपणा, पिशवी का काढली गेली. या प्रकरणात कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.
तर याबाबत डॉक्टर योगेश चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, मृत्यू झालेल्या महिलेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण कळेल. त्यानंतरच योग्य ती कारवाई भूमिका घेतली जाईल.
Post a Comment
0 Comments