Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १८ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  भरारी पथक क्र. २ यांनी दमन निर्मीत मद्यापासून बनावट लेबल व बूचे लावून महाराष्ट्र राज्यात विक्री करिता तयार केलेला बनावट मद्य साठा व गोवा राज्य निर्मीत व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य साठा करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई तब्बल १८ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार नेवाळी नाकाअंबरनाथ कटाई रोड येथे  गस्त घालत असताना एक राखाडी रंगाच्या वॅगनार चार चाकी गाडीवर संशय आल्याने या गाडीला थांबवून त्याची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूस बनावट विदेशी मद्याचा साठा मिळून आला. हा मुद्देमाल व वाहन जप्त करून गुन्हा नोंद करून या गुन्हातील मिळून आलेले दोन्ही इसमास पुढील चौकशीसाठी सोबत घेतले.

 त्यानंतर श्रीकांत टर्ले याने दिलेल्या माहितीच्या आधारे या इसमासोबत नडगाव पडघा या ठिकाणी छापा घातला असता या जागेत प्रदिप बामणे हा इसम दमन निर्मित मद्यापासून बनावट लेबल व बुचे लावून महाराष्ट्र राज्यात विक्री करिता तयार केलेला बनावट मद्य साठा बाळगुन असल्याचा मिळून आला. मुद्देमाल जागीच जप्त करून प्रदिप बामणे यांस पुढील चौकशी कामी सोबत घेतले.  त्यानंतर प्रदिप बामणे याने दिलेल्या माहितीच्या आधारे आनंदवाडी कर्जत या ठिकाण छापा घातला असता गोवा राज्य निर्मीत व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्य साठा मिळून आला.

गुन्हायातील तिनही ठिकाणाहून एकूण विदेशी मद्याचे १२६ बॉक्स मिळून आले. या गुन्ह्यांमध्ये वाहनासह एकूण रू.१८ लाख ८१ हजार ४८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे  श्रीकांत टर्ले, किशोर पाटील, प्रदिप बामणे या आरोपींना  दारुबंदी गुन्हया अंर्तगत अटक केली आहे.

हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कभरारी पथक क्र.२, निरीक्षक ठाणे दिपक परबदुय्यम निरीक्षक टि.सी.चव्हाण आर.व्ही. सानप, जवान के. एस. वझे एस.बी.धुमाळ आर.एम.राठोडव्ही. एस. कुंभार आदींनी केली. या गुन्ह्यांचा पुढील तपास अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिपक परब हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments