ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रथम स्थायी समिती सभापती कै. चंद्रकांत भोईर यांनी साकारलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाचे नुतनीकरण महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागा तर्फे करण्यात आले. या चौकाचे नुतनीकरण केल्यानंतर बुधवारी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
कल्याण पश्चिमेत गुरूदेव हॉटेल शेजारी असलेल्या चौकात महानगरपालिकेचे प्रथम स्थायी समिती सभापती चंद्रकांत भोईर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाची संकल्पना करून चौकाचे नामकरण केले होते. त्यानंतर या चौकात प्रत्येक वर्षी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात येत होती. चर्मकार समाजाचे लोकांनी नंतर पुढाकार घेऊन चौकाचे नुतनीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागा कडे पाठपुरावा केला. त्यानंतर चौकाचे नुतनीकरण करण्यात आले.
बुधवारी या चौकात जयंती साजरी करण्यात आली आणि ज्यांच्या संकल्पनेतून चौक बांधला गेला त्या कै. चंद्रकांत भोईर यांचे सुपुत्र रूपेश भोईर यांनी नारळ फोडून नूतनीकरण झालेल्या चौकाचे उद्घाटन केले. यावेळी कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, बाळा परब, रवि पाटिल, अरविंद मोरे, समृद्ध ताडमारे, निलेश भोर यांच्यासह संत रोहिदास ज्ञाती समाजाचे अध्यक्ष महेश भोईर आणि चर्मकार समाजाचे इतर लोक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments