Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीत सफाई कामगारांच्या अनुसूचित प्रवर्गातील पात्र वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शासन निर्यणाची केडीएमसीने अमंलबजावणी करीत  सफाई कामगारांच्या अनुसूचित प्रवर्गातील 66 पात्र वारस  उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.                    

पात्र उमेदवारांना शैक्षणिक महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, यांच्याकडील पत्र क्रमांक – न्यायाप्र२०२३/प्र.क्र.४८/सआक, दिनांक १२ जुर्ले २०२४ च्या आदेशान्वये उच्च न्यायालयाच्या आदेशात वाल्मिकी मेहत्तर व रुखी या जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या सोबत अनुसुचित जाती व नव बौध्द प्रवर्गातील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्ती  देण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अनुसुचीत प्रवर्गातील ६६ पात्र उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 या ६६ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांना "लिपीक टंकलेखक" पदावर, ११ उमेदवारांना "शिपाई" पदी व उर्वरीत ४३ उमेदवारांना "सफाई कामगार" पदावर नियुक्ती देण्यात आली असल्याने या उमेदवारांचा आनंद व्दिगुणीत झालेला दिसून आला.

Post a Comment

0 Comments