ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
प्रथम प्रेम हेच समजून घेऊ या.प्रेम ही अंतर मनातील एक हळुवार भावना आहे. अन हिच भावना अतित असून निरंतर जपण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे ते दिवसा गणिक वृद्धिंगत होत असतें, अन जीवन जगणे सहज सोपे समृद्ध होते, फक्त ते मनापासून मनस्वी जपले पाहिजे, म्हणजे अंतरात खोलवर रुजत जाते असे मला अंतरंगात, जाणीवपूर्वक मनोमन जाणवते.
प्रेम चिरंजीवी असते, कोणत्याही नात्यांमध्ये दोघांनीही एकमेकांसाठी सातत्याने व्यक्त केले पाहिजे. त्यासाठी ची रसिकता प्रेमळ भावना, ही आतून आलेली उर्मि असावी, ती उसने अवसानमुळे आलेली नसावी. प्रेमाचे पाईक होण्यास बहुधा इतके पुरेसे आहे. तर मग वृद्धापकाळात वार्धक्य न येता पिकल्या पानातच हिरवी मने मनमुराद डोलताना दिसतील असे मला मनस्वी वाटते.
संसारात, समाजात, नातेवाईक, यामध्ये जीवन जगताना,प्रत्येक ठिकाणी प्रेमाचे निरनिराळे रंग दिसून येतात, अन त्यास एक हळुवार हळवी किनार लाभली आहे. ती अनुभूती ने अनुभवास मिळते. प्रेमाचा नेमका कसा दिसतो, हे त्या प्रेम करणाऱ्यालाच दिसते. अन्य कोणास नाही. प्रेम देणे व घेणे ही प्रक्रिया तेथे होत असते. किती उच्च, तर, तम, प्रेमाचे स्तर असतील तसे त्यानुसार ते जाणवते. यामध्ये निरपेक्ष, निर्व्याज, निरलस, निव्वळ मातेचे आपुल्या अपत्यावर असते. जन्मदात्यांच्या प्रेमाला उपमा देणे तसे कठीणच. पण दैनंदिन जीवनात ते महत्वाचेच. व्यक्तीमधील आपुलकीचे, आत्मीयतेचे बंध नात्यानात्यामध्ये सृजनशीलता, जिव्हाळा निर्माण करतात. खरे तर प्रेमासाठी भाषेची गरजच नसते. ते नुसत्या नजरेतच, समोरील व्यक्तीच्या नजरेस कळते. समोरील व्यक्तीस जसे प्रेम अनुभवास मिळते तसाच त्या प्रेमाचा रंग दिसतो, असे मला एकंदरीत जाणवते. प्रेम हे फक्त अन फक्त अनुभूतिने अनुभवायची प्रक्रिया असते. त्यात सर्वच रंग जसे नाते असेल त्यानुसार दिसू शकतात, यावर दुमत नसावे, सध्या एव्हढ पुरेसे.
Post a Comment
0 Comments